'बिग बॉस मराठी ३'चा उपविजेता, अभिनेता आणि मॉडेल जय दुधाणेला पोलिसांनीअटक केली आहे. जयला मुंबई विमानतळावरुन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जयने बनावट कागदपत्रं तयार करुन लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. यामुळे फक्त जयच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील आई, बहीण, आजी, आजोबा यांचीही चौकशी केली जाणार आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरणजयला पोलिसांनी केली अटक, प्रकरण काय?मिळालेल्या माहितीनुसार, जय दुधाणेने बनवट कागदपत्र तयार करुन लोकांना दुकानं विकली. दुकानांच्या या विक्रीचा व्यवहार जयने बेकायदेशीरपणे झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ही दुकानं खरेदी केलेल्या अनेक लोकांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जयने केलेली ही फसवणूक ५ कोटींची असल्याचंही उघड झालंय. त्यामुळे जय आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंबंधी जय किंवा त्याच्या टीमने कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही. जय या प्रकरणात खरंच दोषी आहे का, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
Web Summary : 'Bigg Boss Marathi 3' fame Jay Dudhane has been arrested at Mumbai airport for allegedly creating fake documents and defrauding people in illegal shop sales. His family is also under investigation. He recently married Harshala Patil.
Web Summary : 'बिग बॉस मराठी 3' फेम जय दुधाने को मुंबई एयरपोर्ट पर नकली दस्तावेज बनाने और अवैध रूप से दुकानों की बिक्री में लोगों को धोखा देने के आरोप में गिरफ्तार किया गया है। उनके परिवार की भी जांच चल रही है। उन्होंने हाल ही में हर्षला पाटिल से शादी की थी।