'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या चर्चेत आहे ती तिच्या यूट्यूब चॅनलमुळे. अभिनयाचा सोबतीला स्वतःची निर्मिती असलेल्या यूट्यूब चॅनलमधून तिने महाराष्ट्रामधल्या मंदिरांचा प्रवास सुरू केला आहे आणि नवरात्रीनिमित्तानं तिने येवलामधल्या एका खास मंदिराला भेट दिली आहे.
या प्रवासाबद्दल बोलताना तेजस्विनी लोणारी सांगते "टेम्पल ट्रेल्समधला हा मंदिरांचा प्रवास नवरात्रीच्या उत्सवात महाराष्ट्रामधल्या अश्या एका मंदिरात जाऊन पोहचला जे माझ्या खूप जवळच आहे मी मुळात येवल्याची असल्याने प्रत्येक नवरात्री मध्ये माझं मूळ असलेल्या येवल्याच्या जगदंबा माता मंदिर कोट्टमगा इथे नक्की जाते. आमच्यासाठी हे श्रध्दा स्थान आहे. असं म्हणतात की इथे मागितलेली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते. नवसाची देवी असलेली ही माता जगदंबा कायम सगळ्यांचं रक्षण करते आणि माझ्या मंदिरांच्या प्रवासात हे मंदिर प्रेक्षकांना दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. दरवर्षी नवरात्रीचे उपवास करत असताना नऊ दिवसाचं खास फोटो शूट करणं हे खूप खास गोष्ट आहे. नवरात्रीत शूट करत असताना या नऊ दिवसाची गंमत यातून अनुभवता येते".
नऊ दिवसाची अनोखी ऊर्जा दाखवत तेजस्विनीने नवरात्री उत्सवात नऊ रंगाच्या साडीत छान फोटोशूट देखील केलं आहे. फॅशन आणि लाईफस्टाइल यांना सणाचा मॉर्डन टच देऊन तिने हे सुंदर फोटो शूट केलं आहे. अभिनेत्री असलेल्या तेजस्विनी ने स्वतःचा हा निर्मिती विश्वातला प्रवास देखील सुरू केला असून येणाऱ्या काळात ती कोणत्या नवीन भूमिका मध्ये दिसणार आहे हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
Web Summary : Tejaswini Lonari's YouTube channel explores Maharashtra's temples. She highlights Yeola's Jagdamba Mata, a cherished family shrine where wishes are believed to come true. Lonari also showcased her Navratri photoshoot, blending fashion and tradition.
Web Summary : तेजस्विनी लोणारी का यूट्यूब चैनल महाराष्ट्र के मंदिरों की खोज करता है। उन्होंने येवला की जगदंबा माता पर प्रकाश डाला, जो एक प्रिय पारिवारिक मंदिर है जहाँ मनोकामनाएँ पूरी होती हैं। लोणारी ने नवरात्रि फोटोशूट भी दिखाया, जिसमें फैशन और परंपरा का मिश्रण था।