Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ट्रॉफी हातात आहे, पण मन दुखावलंय...", 'बिग बॉस' विजेती तन्वी कोलते का रडली? पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:48 IST

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाची विजेती तन्वी कोलते का दुखावली? म्हणाली...

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte : 'बिग बॉस मराठी'चे सहावे पर्व नुकतेच संपले. या पर्वामध्ये सुरुवातीला १७ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यानंतर ४ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली होती. अखेरीस तन्वी कोलते ही 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली. राकेश बापटला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर, विशाल कोटियन तिसऱ्या क्रमांकावर होता. अनुश्री माने चौथ्या क्रमांकावर घराबाहेर पडली आणि पाचव्या क्रमांकावर दीपाली सय्यद होती.  विजेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यानंतर जिथे आनंदाचे वातावरण असायला हवे होते, तिथे विजेती तन्वी कोलते हिला मात्र अश्रू अनावर झाले आहेत.  शंभर दिवसांचा खडतर प्रवास करूनही प्रेक्षकांच्या काही नकारात्मक कमेंट्समुळे तन्वी दुखावली आहे.

तन्वीनं नुकतंच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, "डोळे भरलेले आहेत, हे त्या लोकांच्या प्रेमामुळेच आहे. पण मोबाईल हातात घेतल्यानंतर जेव्हा मी कमेंट्स वाचते, तेव्हा खूप जण लिहितात की "तू डिझर्विंग नव्हती" वगैरे… आणि खरंच सांगायचं तर, ते खूप जास्त हर्ट करतं. १०० दिवसांचा प्रवास करून, प्रत्येक क्षणी मेहनत घेऊन, सगळं काही पणाला लावून जेव्हा आपण ट्रॉफी हातात घेतो, तेव्हा तो क्षण आयुष्यातला सर्वात मोठा असतो. पण त्याच वेळी, एका हातात फोन घेऊन जेव्हा अशा कमेंट्स वाचायला मिळतात, तेव्हा मनात एकच प्रश्न येतो "खरंच मी डिझर्विंग नव्हते का?".

टीकाकारांना उत्तर देताना तन्वी पुढे म्हणाली, "शेवटी जनता आपलं खरं मत देत असते, त्यांचं प्रेम खूप महत्त्वाचं असतं. पण काही निगेटिव्ह कमेंट्स पाहून असं वाटतं की, इतक्या मोठ्या प्रवासाचं मूल्य इतकं सहज कसं ठरवलं जाऊ शकतं? १०० दिवसांचा प्रवास एका क्षणात जज करता येत नाही. त्या प्रवासात किती वादळं आली, किती संघर्ष झाला, हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतं. हा सीझन खूप कठिण होता. इतक्या दिवस टिकून राहणं, स्वतःला सांभाळणं, चुका न होणं, हे शक्यच नाही. कधीतरी चूक होतेच. पण बारा आठवडे व्यवस्थित खेळून, तेराव्या आठवड्यात आलेल्या काही गोष्टींवरून इतका द्वेष मिळणं… हे थोडं वेदनादायक आहे".

तन्वी म्हणाली,  "मी अशी मुलगी आहे जी द्वेष करणाऱ्यांनाही एक दिवस प्रेम करायला भाग पाडेल. कदाचित मी कुठेतरी चुकले असेन म्हणून लोक रागवले असतील. पण एक दिवस नक्की येईल, जेव्हा तुम्ही सगळेच म्हणतील तन्वी कोलतेच खरी डिझर्व्हिंग विनर होती आणि तो दिवस लवकरच येईल… मला यावर पूर्ण विश्वास आहे". 

English
हिंदी सारांश
Web Title : "Trophy in hand, but heart broken..." Why Tanvi Kolte cried?

Web Summary : Bigg Boss Marathi 6 winner Tanvi Kolte, despite winning, was hurt by negative comments online questioning her deservingness. She expressed feeling devalued after her 100-day journey and vowed to win over her critics with love, believing she will prove to be a deserving winner.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६