Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: तन्वीने सागर कारंडेला केलं नॉमिनेट, अभिनेत्याचा चढला पारा, म्हणाला- "एवढी तरी अक्कल पाहिजे..."

By कोमल खांबे | Updated: January 14, 2026 13:09 IST

नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वी सागर कारंडेला थेट नॉमिनेट करते. तन्वीने नॉमिनेट केल्याचं पाहून सागरला फार मोठा धक्का बसतो. नॉमिनेशन टास्कवरुन सागर कारंडे आणि तन्वीमध्ये हमरी तुमरी झाल्याचंही पाहायला मिळतं.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचं नवं पर्व सुरू होऊन २ दिवस झाले आहेत. नुकतंच घरातील राशनसाठी बिग बॉसकडून टास्क खेळवण्यात आला. त्यानंतर आता यंदाच्या पर्वातील पहिला नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या टास्कदरम्यानचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ज्या सदस्याला घरातून बाहेर काढायचे आहे. त्या सदस्याची पतंग कापायची आहे. नॉमिनेशन टास्कवरुन तन्वी आणि सागरमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

कलर्स मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की तन्वीच्या हातात सागर कारंडेचा फोटो असलेला पतंग आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वी सागर कारंडेला थेट नॉमिनेट करते. तन्वीने नॉमिनेट केल्याचं पाहून सागरला फार मोठा धक्का बसतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नॉमिनेशन टास्कवरुन सागर कारंडे आणि तन्वीमध्ये हमरी तुमरी झाल्याचंही पाहायला मिळतं. "सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत", असं म्हणत तन्वीने सागरला नॉमिनेट केलं. त्यानंतर सागरचा पाढा चढल्याचं दिसलं. तो तन्वीला म्हणाला, "आपण काय बोलतोय एवढी तर अक्कल पाहिजे". 

त्यानंतर तन्वी म्हणते, "मी नॉन्सेस आहे हे बोलायची गरज नाहीये". ते ऐकून सागरचा पारा अजून चढतो. तो तन्वीला म्हणतो, "मी तुला आधीच म्हटलेलं मी बोलत असताना मध्ये बोलू नकोस". मग तन्वी त्याला म्हणते, "ऐ आवाजाला मी घाबरत नाही... तू मला शिकवणार". 'बिग बॉस मराठी'च्या घरातील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी यावर कमेंटही केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tension in Bigg Boss: Tanvi nominates Sagar, heated argument erupts.

Web Summary : Bigg Boss Marathi 6 witnesses its first nomination task. Tanvi nominates Sagar, leading to a fiery argument. Sagar retorts, questioning Tanvi's understanding. The video goes viral, sparking fan reactions.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार