Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Episode: 'बिग बॉस मराठी ६'चा पहिला आठवडा चांगलाच गाजला. भांडणं, टास्क, मजा मस्ती या सगळ्यात प्राजक्ताच्या सुरेल आवाजानेही वातावरण बदललं. गायिका प्राजक्ता शुक्रे पहिली कॅप्टन झाली. आता सगळ्यांचं लक्ष आज भाऊच्या धक्क्यावर काय होतं याकडे आहे. रितेश देशमुख कोणाची कानउघाडणी करणार आणि कोणाचं कौतुक करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान कलर्स मराठीने या सीझनच्या पहिल्या 'भाऊचा धक्का'चा प्रोमो शेअर केला आहे.
प्रोमोमध्ये आपल्या भाऊने तन्वी कोलतेला फैलावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 'तंटा क्वीन' असं नावच रितेशने तन्वीला दिलं आहे. रितेश तन्वीला सुनावत म्हणाला, "किती बोलते..किती बोलते..तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन. तुम्हाला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की मग रडायचं असतं. तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे." यानंतर तन्वी मध्येच बोलणार तितक्यात रितेश तिच्यावर रागवतो.
एकंदर आज भाऊच्या धक्क्यावर मजा येणार आहे. अख्खा आठवडा तन्वीने भांडणातच घालवला. तन्वी सागर कारंडेला नको नको ते बोलली. त्याला प्रोफेशनवरुन, कॉमेडीवरुन हिणवलं. यावर सागर कारंडेही तिच्यावर भडकला होता. यामुळे सगळ्यांचाच तन्वीवर प्रचंड राग आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया देत तन्वीला सुनावलं. आता भाऊच्या धक्क्यावर तन्वीला रितेशच्या रागालाही सामोरं जावं लागणार आहे.
Web Summary : Ritesh Deshmukh reprimands Tanvi Kolte on Bigg Boss Marathi 6, labeling her the 'Quarrel Queen.' He criticizes her constant talking, arguing, and crying, stating her 'tongue has no brakes.'
Web Summary : रितेश देशमुख ने बिग बॉस मराठी 6 में तन्वी को फटकार लगाई, उन्हें 'झगड़ा रानी' कहा। उन्होंने उसकी लगातार बोलने, बहस करने और रोने के लिए आलोचना की, और कहा कि उसकी 'जुबान पर कोई लगाम नहीं है।'