Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi : 'तिकीट टू फिनाले' कोणाला मिळणार? सदस्यांना करावी लागणार कसरत, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:47 IST

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार असून फायनलपर्यंत थेट पोहोचण्याची संधी घरातील सदस्यांना मिळणार आहे. यासाठी घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये बाजी मारणारा सदस्य थेट बिग बॉस मराठी ६च्या फिनालेमध्ये पोहोचेल. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार असून फायनलपर्यंत थेट पोहोचण्याची संधी घरातील सदस्यांना मिळणार आहे. यासाठी घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये बाजी मारणारा सदस्य थेट बिग बॉस मराठी ६च्या फिनालेमध्ये पोहोचेल. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

प्रोमोमध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना म्हणतात, "बिग बॉस आपल्याला संधी देत आहेत मोठी झेप घेण्याची... कारण बिग बॉस घेऊन आले आहेत सीझन ६चं तिकीट टू फिनाले. तिकीट टू फिनाले जिंकणारा सदस्य ठरेल पहिला फायनलिस्ट". थेट फायनलमध्ये पोहोचण्याची संधी मिळणार हे ऐकल्यानंतर मात्र घरातील सदस्यही खूश होत असल्याचं दिसत आहे. आता तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकून थेट फायनलमध्ये कोण पोहोचतं हे पाहणं रंजनकारक असेल. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात सागर कारंडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. आता घरात तन्वी कोलते, राखी सावंत, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद, रेवा कौरासे आणि राकेश बापट हे टॉप ७ सदस्य आहेत. आता यापैकी टॉप ५ मध्ये कोणते सदस्य स्थान मिळवणार हे पाहावं लागेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi: Ticket to Finale task creates excitement!

Web Summary : Bigg Boss Marathi 6 nears its finale. A 'Ticket to Finale' task offers contestants a direct path to the final. The winner becomes the first finalist. Last week, Sagar Karande was evicted. Now, seven contestants compete for the top spots.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार