Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'च्या घरात आणखी एक वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्प्लिट्सव्हिला फेम मॉडेलची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:58 IST

'बिग बॉस मराठी ६'मध्ये दोन आठवड्यापूर्वीच तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री घेतली. संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंखे हे तीन सदस्य घरात वाइल्ड कार्ड म्हणून आले. आता बिग बॉसच्या घरात आणखी एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दोन आठवड्यापूर्वीच तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री घेतली. संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंखे हे तीन सदस्य घरात वाइल्ड कार्ड म्हणून आले. यांच्याआधी राखी सावंतने पहिली वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेत घरातील सदस्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. आता बिग बॉसच्या घरात आणखी एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

वाइल्ड कार्ड एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या घरातील गेम हा पूर्णपणे बदलून गेला आहे. आता नव्या वाइल्ड कार्डची चर्चा होऊ लागली आहे. स्प्लिट्सव्हिला फेम आणि मॉडेल असलेली अनिशा शिंदे बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. याला कारण ठरलंय ते म्हणजे अनिशाची इन्स्टाग्राम स्टोरी. अनिशाने तिच्या चाहत्यांसोबत Ask Me सेशन घेतलं होतं. यामध्ये तिला चाहत्याने पुढच्या प्रोजेक्टबद्दल विचारलं. चाहत्याला उत्तर देताना अनिशाने बिग बॉस मराठीबद्दल हिंट दिली. "मराठी बिग बॉस" असं उत्तर तिने दिलं आहे. त्यामुळे अनिशाच्य वाइल्ड कार्ड एन्ट्रीबाबत चर्चा रंगली आहे. 

कोण आहे अनिशा शिंदे? 

अनिशा शिंदे ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. स्प्लिट्सव्हिला १६मध्ये ती सहभागी झाली होती. या शोमधून तिने नुकतीच एक्झिट घेतली आहे. स्प्लिट्सव्हिलामधून बाहेर पडल्यानंतर अनिशाने बिग बॉस मराठीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर अनिशाने बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली तर पुन्हा समीकरणं बदललेली दिसतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Another Wild Card Entry in Bigg Boss Marathi? Model Anisha Shinde Rumored

Web Summary : Bigg Boss Marathi 6 may see another wild card entry. Model Anisha Shinde, known for Splitsvilla, hinted at joining the show, sparking speculation among fans after a recent social media interaction. Her entry could shake up the game.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार