Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी ६'मध्ये राखी सावंतची धमाक्यात एन्ट्री होणार? सोनाली राऊत 'ड्रामा क्वीन'बद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:46 IST

'ड्रामा क्वीन' राखी सावंत पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेणार?

'बिग बॉस' हा वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. 'हिंदी बिग बॉस' संपल्यानंतर 'बिग बॉस' मराठीचं सहावं पर्व सुरू झालं आहे. यावेळी या शोमध्ये कलाकारांसह प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहेत. 'बिग बॉस मराठी ५' प्रमाणेच हा 'बिग बॉस मराठी ६'चा हंगामही चांगलाच गाजत आहे.  घरातील वाद, टास्क आणि स्पर्धकांमधील चढाओढ यामुळे प्रेक्षक खिळून राहिले आहेत. मात्र, आता प्रेक्षकांचे मनोरंजन दुप्पट होण्याची शक्यता आहे. कारण, 'ड्रामा क्वीन' राखी सावंत पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

'बिग बॉस मराठी ६'ची स्पर्धक सोनाली राऊत हिने नवशक्तीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राखीच्या एन्ट्रीबद्दल भाष्य केलंय. ती म्हणाली, "मला १०० टक्के खात्री आहे की यावेळेस राखी सावंत येणार. मी तिला कुठेतरी बोलताना ऐकलं होतं की, तिला पुन्हा एकदा बिग बॉस मराठीमध्ये जायचं आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक किंवा पाहुणी म्हणूनही तिला घरात पाऊल टाकायला नक्कीच आवडेल".

राखीसोबतच्या आपल्या मैत्रीबद्दल सांगताना सोनाली म्हणाली, "राखी स्वभावाने खूप चांगली आहे. मी जेव्हा 'हिंदी बिग बॉस'च्या आठव्या सीझनमध्ये होते, तेव्हा तिने मला पाठिंबा दिला होता. आम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र असतो, त्यामुळे आमची भेट होत राहते. ती कमालीची एंटरटेनिंग आणि मजेशीर आहे". तसेच राखीच्या व्हायरल व्हिडीओंचा उल्लेख करत सोनालीने तिचं कौतुक केलं. सोनाली राऊतच्या या वक्तव्यानंतर  सोशल मीडियावर राखी सावंतच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता राखी खरोखरच घरात एन्ट्री घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rakhi Sawant May Enter Bigg Boss Marathi 6: Sonali Raut Speaks

Web Summary : Drama Queen Rakhi Sawant might enter Bigg Boss Marathi 6. Sonali Raut believes Rakhi expressed her desire to join, either as a wild card or guest. Sonali praised Rakhi's supportive nature and entertaining personality, creating excitement among fans.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६राखी सावंत