Bigg Boss marathi 6: बिग बॉस मराठी ६ या पर्वाचा दुसरा आठवडा सुरू आहे. घरात राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. राकेशने अनुश्रीचा हात धरत तिला त्याच्या बेडवरुन उठवल्याने त्यांच्यात भांडण झालं. अनुश्रीने राकेशवर गंभीर आरोप केले. तर रुचिता जामदारनेही राकेशने चुकीच्या पद्धतीने वागल्याचं म्हणत परवानगी न घेता अनुश्रीला हात लावल्याचं म्हटलं. त्यामुळे राकेशचाही पारा चढला होता. या संपूर्ण प्रकरणावरच आता सगळीकडूनच संताप व्यक्त केला जात आहे. मराठी अभिनेत्री सोनाली पाटील हिने राकेशला पाठिंबा देत अनुश्री आणि रुचितावर संताप व्यक्त केला आहे.
सोनालीने व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, "आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या त्यामुळे हा व्हिडीओ बनवावासा वाटला. आजचा एपिसोड बघून खूप वाईट वाटलं. अनुश्रीला राकेशने झोपेतून उठवलं आणि तिला ते काहीतरी विचित्र वाटलं की असं कसं मला हात लावू शकतो वगैरे... हा मुद्दा तिने तेव्हा काढला नाही जेव्हा राकेशने तिला खरोखर उठवलं. तर त्याच्यानंतर जेव्हा सगळे हॉलमध्ये बसलेले होते तेव्हा या दीडशहाण्या पोरींनी चारचौघात तो मुद्दा काढला. मला इथे सगळ्यांना आठवून करून द्यायचीये की बिग बॉस मराठी सीझन ३ वर तुम्ही इतकं प्रेम केलंत आणि अजूनही करताय. तेव्हाही एक अशी घटना घडली होती. आपल्याला खरं तर या गोष्टी लक्षातही नसतात की आपण कोणाला कसं हात लावतोय, टाळी वाजवतोय दंगा करतोय. एकमेकांच्या अंगावर पडून हसतोय किंवा काय... तिकडे विकास पाटील होते आणि मीनल शाह होती. आजही ते माझे चांगले मित्र आहेत. तेव्हा एक व्यक्ती चावडीवर बोलली होती की हिने मला गरज नसताना हात लावला... आज तसंच काहीसं पाहायला मिळालं".
"अनुश्री आणि रुचिताने राकेशवर काहीही आरोप केले. जर तुम्ही एवढ्या काच की गुडिया आहात तर तुम्ही घरात बसा. आणि दुसरी गोष्ट जेव्हा एखाद्याच्या चारित्र्यावर अशाप्रकारे संशय घेतला जातो तेव्हा तुम्ही तुमच्या सोयीने त्याचा वापर करता. आणि समोरच्याला बोलता की आम्हाला असा वाईटप्रकारे स्पर्श केला. म्हणजे तिकडे १ हजारपेक्षा जास्त कॅमेरे तुमच्या चेहऱ्यावर असतात. तर ती असं काही करण्याची ती जागा आहे, असं तुम्हाला वाटतं का? राकेशला पण आज तसंच वाटत असेल. कारण त्याचा तसा हेतूच नव्हता. रितेश दादांना मला विनंती करायची आहे की जे माझ्या बाबतीत झालं ते प्लीज राकेशच्या बाबतीत व्हायला नको. कारण बिग बॉस मराठीचा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. इथे सगळे नाव कमावण्यासाठी येतात... घालवण्यासाठी नाही. मुलगा असेल किंवा मुलगी प्रत्येक जण आपलं चारित्र्य जपत असतो. पण दीड शहाण्या लोकांमुळे याचं भांडवल होतं", असंही तिने पुढे म्हटलं आहे.
सोनालीने राकेशला पाठिंबा देत म्हटलं की "आज राकेशला काय वाटत असेल हे मी खरंच समजू शकते. आता तर फक्त दुसरा तिसरा आठवडा सुरू आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर तिथल्या दीड शहाण्या मुलींना जरा तरी शहाणं करावं, फार बरं होईल. रितेश दादा माझ्या सीजनला तुम्ही नव्हता पण आता तसं व्हायला नको. इतकं सगळं होऊ नये माझ्या प्रेक्षकांनी मला कायम पाठिंबा दिला आहे. आणि बिग बॉस मराठीची कायम ऋणी राहीन".
Web Summary : Sonali Patil supports Rakesh Bapat after Anushree's accusations in Bigg Boss Marathi 6. She criticizes Anushree and Ruchita, urging viewers to remember past incidents and protect contestants' reputations on the show. Sonali requests justice for Rakesh, referencing her experience.
Web Summary : सोनाली पाटिल ने बिग बॉस मराठी 6 में अनुश्री के आरोपों के बाद राकेश बापट का समर्थन किया। उन्होंने अनुश्री और रुचिरा की आलोचना की, दर्शकों से पिछली घटनाओं को याद रखने और शो में प्रतियोगियों की प्रतिष्ठा की रक्षा करने का आग्रह किया। सोनाली ने राकेश के लिए न्याय की गुहार लगाई, अपने अनुभव का हवाला दिया।