'बिग बॉस मराठी ६' या पर्वात पहिल्याच आठवड्यात घरामध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी टास्कवरुन बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकमेकांना भिडले. तर काही स्पर्धकांची जीभही घसरल्याचं दिसलं. तन्वी कोलतेने कॅप्टन्सी टास्कमध्ये झालेल्या वादात सागर कारंडेच्या प्रोफेशनचा मुद्दा काढला. कॉमेडीवरुन बोलल्याने सागरदेखील भडकला. दिपाली सय्यद, करण सोनावणे आणि घरातील इतर सदस्यांनीही तन्वीला यावरुन विरोध करत चांगलंच सुनावलं. कॉमेडीचा बादशहा असलेल्या आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सागरला अशाप्रकारे बोलल्याने तन्वीवर चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.
मराठी कलाकारही सागर कारंडेला पाठिंबा देत आहेत. विशाखा सुभेदार आणि गायत्री दातार या कलाकारांनंतर सोनाली पाटील हिने व्हिडीओ शेअर करत तन्वीला सुनावलं आहे. सोनाली म्हणते, "तू कॉमेडी करून भांडणं मिटवतोस म्हणजे?? कॉमेडी करणं चांगलंय की भांडणं मिटवणं चांगलंय?? म्हणजे माझ्या दृष्टीने दोन्हीही चांगलंय. कॉमेडी करणं हे त्याचं प्रोफेशन आहे. त्याच्याबद्दल त्याला गर्व आहे. एक कलाकार म्हणून त्याचा मलाही गर्व आहे. एवढं सगळं झालं तरी बिग बॉस तिला काही बोलणार नाही. तिला फक्त थोडंसं ओरडलं जाईल. नंतर मग तिला खूप रडू येईल. आणि त्यानंतर ती सॉरी बोलेल. सागर दादाचं खरंच मन मोठं आहे. तो तिला माफ पण करेल. आणि पुन्हा जेव्हा तोंड उचकटायचं तेव्हा ती तसंच बोलेल. कारण तिचा तो स्वभाव आहे. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर भांडलं पाहिजे हे तिला सांगायचं आहे".
बिग बॉसच्या घरात होणाऱ्या पहिल्या कॅप्टन्सीसाठी प्राजक्ता शुक्रे, तन्वी कोलते, अनुश्री माने आणि सोनाली राऊत यांच्यामध्ये टास्क होणार आहे. यापैकी कोण बिग बॉस मराठी ६च्या घरात पहिल्या कॅप्टन्सीचा बहुमान मिळवतं, हे पाहावं लागेल. तर या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत दिपाली सय्यद, अनुश्री माने, करण सोनावणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, रोशन भजनकर, दिव्या शिंदे आणि राधा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
Web Summary : Sonali Patil criticizes Tanvi Kolte for her comments about Sagar Karande's profession in 'Bigg Boss Marathi 6'. She predicts Tanvi will apologize but repeat her behavior. The first captaincy task will be between Prajakta Shukre, Tanvi Kolte, Anushree Mane and Sonali Raut.
Web Summary : सोनाली पाटिल ने 'बिग बॉस मराठी 6' में सागर कारंडे के पेशे के बारे में तन्वी कोलते की टिप्पणियों की आलोचना की। उन्होंने भविष्यवाणी की कि तन्वी माफी मांगेंगी लेकिन अपना व्यवहार दोहराएंगी। पहला कैप्टेंसी कार्य प्राजक्ता शुक्रे, तन्वी कोलते, अनुश्री माने और सोनाली राउत के बीच होगा।