Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'च्या घरात होणार डबल एव्हिक्शन, प्रभू शेळकेसोबत कोण जाणार घराबाहेर? चाहते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:02 IST

भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्य आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरातून एक नव्हे तर दोन सदस्यांना एक्झिट घ्यावी लागणार आहे. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा आठवडा खास ठरला. फॅमिली वीकच्या या आठवड्यात स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी 'बिग बॉस'च्या घरात येत सदस्यांना खास सरप्राइज दिलं. पण आता भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्य आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरातून एक नव्हे तर दोन सदस्यांना एक्झिट घ्यावी लागणार आहे. 

भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रितेश देशमुख घरातील सदस्यांना मोठा धक्का देत आहे. रितेश म्हणतो, "या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार आहेत. एक काटा गँगमधला आहे आणि एक टोळीमधला आहे. त्यातील पहिलं एव्हिक्शन काटा गँगमधला एक सदस्य आज एलिमिनेट होणार आहे". त्यानंतर तन्वी कोलते रडत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. 

सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की प्रभू शेळके या आठवड्यात घराबाहेर जाणार आहे. या प्रोमोमध्ये तन्वी रडताना दिसत असल्याने प्रेक्षकांनी प्रभू घराबाहेर जाणार असल्याचा अंदाजही लावला आहे. टोळी गँगमधील प्रभू बाहेर गेल्याने तन्वीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. 

प्रभूसोबत काटा गँगमधला संकेत पाठक एक्झिट घेणार असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉस मराठीचे अपडेट्स देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन याबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वीच संकेतने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. त्याचा गेमही प्रेक्षकांना आवडत होता. संकेत हा बिग बॉसच्या घरातील स्ट्राँग स्पर्धक मानला जात होता. त्यामुळेच त्याच्या एलिमिनेशनवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Double eviction in Bigg Boss Marathi; fans upset with exits.

Web Summary : Bigg Boss Marathi witnesses a shocking double eviction this week. Prabhu Shelke and Sanket Pathak are reportedly leaving the house. This elimination has sparked disappointment among viewers, especially regarding Pathak's unexpected exit.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार