Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी ६' हे पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. आणि अशातच घरातील चर्चेतील सदस्य असलेल्या सागर कारंडेला घरातून एक्झिट घ्यावी लागणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण विशाल कोटियन किंवा सागर कारंडे या दोघांपैकी एकाचा प्रवास संपणार आहे.
प्रोमोमध्ये दिसतंय की सागर आणि विशाल हे डेंजर झोनमध्ये आहेत. घरातील सदस्य विशाल घराबाहेर जाईल असा अंदाज व्यक्त करतात. पण, विशाल नव्हे तर सागर कारंडेला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. बिग बॉस मराठीचे अपडेट्स देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन सागर कारंडे घराबाहेर जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रोमो पाहून चाहत्यांनी सागर कारंडे घराबाहेर गेल्याचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत सागर कारंडे, राखी सावंत, राकेश बापट, अनुश्री माने, रेवा कौरासे, विशाल कोटियन हे सदस्य नॉमिनेट झाले होते. सागरने एक्झिट घेतली तर अनुश्री माने, रेवा कौरासे, विशाल कोटियन, राखी सावंत, राकेश बापट, दिपाली सय्यद आणि तन्वी कोलते हे टॉप ७ सदस्य ठरतील.
Web Summary : Amidst finale buzz, Sagar Karande's exit from Bigg Boss Marathi 6 is rumored. A promo shows either Sagar or Vishal leaving. An Instagram page suggests Sagar's departure, shocking fans. Top 7 contestants may be finalized soon.
Web Summary : फिनाले की चर्चा के बीच, सागर कारंडे के बिग बॉस मराठी 6 से बाहर होने की अफवाह है। एक प्रोमो में सागर या विशाल के जाने की संभावना है। एक इंस्टाग्राम पेज ने सागर के जाने का सुझाव दिया, जिससे प्रशंसक हैरान हैं। टॉप 7 प्रतियोगी जल्द ही तय हो सकते हैं।