Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठी ६ या पर्वाचा दुसरा आठवडा सुरू आहे. घरात राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. राकेशने अनुश्रीचा हात धरत तिला त्याच्या बेडवरुन उठवल्याने त्यांच्यात भांडण झालं. अनुश्रीने राकेशवर गंभीर आरोप केले. तर रुचिता जामदारनेही राकेशने चुकीच्या पद्धतीने वागल्याचं म्हणत परवानगी न घेता अनुश्रीला हात लावल्याचं म्हटलं. त्यामुळे राकेशचाही पारा चढला होता. घरातही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
अनुश्रीने राकेशवर आरोप केल्यानंतर घरातील सगळेच तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. सागर कारंडेनेही अनुश्रीला चांगलंच झापलं. सागर अनुश्रीला म्हणाला, "उद्या तू हे जर मला बोललीस तर मलाही वाईट वाटेल. अरे आम्ही तुम्हाला बहिणीसारखं मानतो. आणि तुम्ही काय म्हणताय हात लावायचा नाही.. आम्ही काय इथे तुम्हाला हात लावायला आलोय का?". त्यानंतर रुचिता सागरला म्हणते की "मी कुणाच्याही कॅरेक्टरवर गेलेली नाहीये...", मग सागर तिला म्हणतो "इथे कुणाच्याही कॅरेक्टरवर जायची गरज नाही. इथे प्रत्येक जण गेम खेळायला आलाय. आणि हा मुद्दा नाहीये. तुम्हाला वाईट वाटलं तर तुम्ही त्याच वेळेला बोलायला हवं होतं. यापुढे जरा लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्ण दिवस गेला, कितीतरी तास गेले आणि त्यानंतर तुम्ही हे आता बोलताय... आणि आता विषय वेगळा चाललाय.. इथून तिथे कसा काय विषय गेला".
सागरने इतकं सांगूनही रुचिताला कळत नाही. ती पुढे म्हणते "त्यांचं इतकं वर्षांचं काम आहे तर बिग बॉस मलाच बोलणार. कारण मी फ्रेशर आहे. पण, किती वेळा मला रितेश भाऊ जरी बोलले तरी मी बोलते माझं इंटेन्शन ते नव्हतं म्हणजे नव्हतं". आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यावर काय अॅक्शन घेणार, हे पाहावं लागेल.
Web Summary : A major argument erupted between Rakesh Bapat and Anushree Mane on Bigg Boss Marathi 6. Sagar Karande criticized Anushree after she accused Rakesh of inappropriate behavior. Karande stated that they treat her like a sister and dismissed her accusations. Ruchita Jamdar also joined the conversation, leading to further debate about intentions and timing.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में राकेश बापट और अनुश्री माने के बीच बड़ा विवाद हुआ। राकेश पर अनुचित व्यवहार का आरोप लगाने के बाद सागर कारंडे ने अनुश्री की आलोचना की। कारंडे ने कहा कि वे उसे बहन की तरह मानते हैं और उसके आरोपों को खारिज कर दिया। रुचिता जामदार भी बातचीत में शामिल हुईं, जिससे इरादों और समय को लेकर आगे बहस हुई।