Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6: रुचिता जामदारकडून घडली मोठी चूक? करण सोनावणेसमोर हात जोडण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:26 IST

Bigg Boss Marathi 6 Episode 3: बिग बॉस मराठी ६ च्या घरात रुचिता जामदारने असं काहीतरी केलंय की तिच्यावर करण सोनावणेसमोर हात जोडण्याची वेळ आली आहे. काय घडलंय नेमकं?

कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घराचा दरवाजा उघडून आता जेमतेम तीन दिवस उलटले आहेत, पण वादाची ठिणगी मात्र पहिल्याच दिवसापासून पडली आहे. घरात रणनीती आखताना सदस्य दिसून येत आहेत. पहिल्या दिवशी तन्वीसोबत झालेला राडा आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबत झालेली खडाजंगी यांमुळे रुचिता जामदार सध्या घराच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आता समोर आलेल्या एका नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील खेळाला कलाटणी देणारी 'पॉवर की' (Power Key) एका विशिष्ट टास्कदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. बिग बॉस रुचिताला सांगताना दिसत आहेत पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र, या 'पॉवर की' चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी मोठी चूक घडल्याचे संकेत मिळत आहेत. "पॉवर की ला हलक्यात घेणं, पडलं रुचिताला भारी!"  आणि आता हेच तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

ही पॉवर की रुचिताला वाचवणार की तिला थेट अडचणीत टाकणार? या चुकीमुळे तिला घरातील कामांची शिक्षा मिळणार की नॉमिनेशनमध्ये जावं लागणार, हे पाहणं रंजक ठरेल. करणने पॉवर key देण्यास नकार दिला, बिग बॉस यांना सांग पॉवर key करणने घेतली आहे. रुचिता त्याच्या पाया पडताना, त्याची माफी मागताना दिसत आहे. बघूया आता पुढे काय घडणार, आजच्या बिग बॉस मराठीच्या भागात.  रितेश देशमुखच्या 'लयभारी' स्टाईलमध्ये सुरू झालेला हा सीझन आता हळूहळू 'डेंजर' वळण घेऊ लागला आहे. 'बिग बॉस मराठी ६' रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर बघायला मिळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi 6: Ruchita's mistake? Forced to beg Karan.

Web Summary : Ruchita Jamdar's Power Key error in Bigg Boss Marathi 6 may lead to consequences. After a refusal, she begs Karan for forgiveness. The season takes a dangerous turn; watch Colors Marathi.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनकलर्स मराठी