Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा सुरू झाला आहे. आणि या आठवड्यात घरात वादावादी झाल्याचं दिसत आहे. कॅप्टन्सी टास्कवरुन पुन्हा एकदा घरात राडा झाल्याचं दिसत आहे. सुरुवातीला कॅप्टन्सी टास्कमध्ये रुचिता जामदार आणि करण सोनावणे यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. रुचिताने अंगाला हात लावल्याचंही करण म्हणाला होता. त्यांच्यामध्ये हाणामारीही झाली. पण, त्यानंतर मात्र रुचिता थेट राकेश बापटशी भिडली. राकेशसोबतही तिचं जोरदार भांडण झालं होतं.
रुचितासोबत भांडण झाल्यानंतर राकेश बापटही चिडला होता. त्याचा पारा इतका चढला की त्याने घरातील काही वस्तूंची आदळाआपट केली. घरात एक तर ही राहील किंवा मी अशी तंबीच राकेशने बिग बॉसला दिली. राकेशनंतर रुचिताचं दिपाली सय्यदसोबतही वाजलं. दिपालीशी बोलताना रुचिताचा आवाजही चढला होता. रुचिताच्या घरातल्या वागणुकीमुळे प्रेक्षकांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर रुचिता प्रचंड ट्रोल होत असून तिला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत रुचितावर संताप व्यक्त केला आहे. मराठी अभिनेता पुष्कर जोगनेही कमेंट केली आहे. "आता स्पर्धक त्यांची लाइन क्रॉस करत आहेत", अशी कमेंट करत त्याने संताप व्यक्त केला आहे.
"रुचिता एवढं पण अती नाही करायचं", "किती पोरखेळपणा चालू आहे", "बिग बॉस कृपया रुचिताला बाहेर काढा", "जो पर्यंत रुचिता घराबाहेर जाणार नाही तोपर्यंत बिग बॉस पाहणार नाही", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
रुचिताला याआधी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तिच्या वागण्यावरुन खडसावलं होतं. पहिल्या दिवसापासूनच रुचिता घरात वाद घालताना दिसत आहे. आता पुन्हा तिला भाऊच्या धक्क्यावर रितेश सुनावणार का? की बिग बॉस तिच्याबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागेल.
Web Summary : Bigg Boss Marathi 6 sees Ruchita in fights with Karan, Rakesh, and Dipali, leading to audience anger. Rakesh threatened to leave. Viewers demand her eviction due to her behavior. Even Riteish Deshmukh previously warned her.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में रुचिरा, करण, राकेश और दीपाली से झगड़ा करती नजर आईं, जिससे दर्शक नाराज हैं। राकेश ने शो छोड़ने की धमकी दी। दर्शकों ने उनके व्यवहार के कारण उन्हें बाहर निकालने की मांग की। रितेश देशमुख ने भी पहले उन्हें चेतावनी दी थी।