Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात अनेक सदस्यांमध्ये मैत्री झाल्याचं दिसलं होतं. पण आता या मैत्रीचं प्रेमात रुपांतर होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागलेत की काय , असा प्रश्न नवा प्रोमो बघून चाहत्यांना पडला आहे. टोळीमधील रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्यातील मैत्रीचं समीकरण आता बदलत असल्याचं दिसत आहे.
रुचिताचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रुचिता अनुश्रीशी तिच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहे. अनुश्री रुचिताला विचारते की "तुला विशालबद्दल काय फिलिंग्स आहेत?". तेव्हा रुचिता तिच्या मनातील भावना व्यक्त करते. ती म्हणते, "मला त्याचा प्रेझेंस आवडतो. जेव्हा घर माझ्या चुकांबद्दल बोलतं तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलतो. मी त्याच्याशी खूप अटॅच आहे. खूप म्हणजे खूप". रुचिता विशालबद्दल बोलताना भावुक होते आणि तिला रडू येत असल्याचं दिसत आहे.
रुचिताच्या विशालबद्दलच्या फिलिंग्स पाहून अनुश्रीही आश्चर्यचकित होते. आता त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर होणार का? रुचिता तिच्या भावना विशालकडे व्यक्त करणार का? विशाल यावर काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. "या सीझनची फर्स्ट लव्हस्टोरी", "काल राखीने बरोबर घाव घातला", "राखीने इमोशन्स वाढवले" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काहींनी ती कॅमेरासाठी हे सगळं करत असल्याचं म्हटलं आहे.
Web Summary : Ruchita's Bigg Boss confession about Vishal's positive impact has fueled romance speculation. She expressed deep attachment, moved to tears. Will this friendship blossom into love?
Web Summary : विशाल के सकारात्मक प्रभाव के बारे में रुचिरा के बिग बॉस कबूलनामे ने रोमांस की अटकलों को हवा दी। उसने गहरे लगाव व्यक्त किया, आँसू छलके। क्या यह दोस्ती प्यार में खिलेगी?