Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या गेल्या आठवड्यात कोणताच सदस्य कॅप्टन झाला नाही. टास्कचा निर्णय अनिर्णित राहिल्याने बिग बॉसचं घर कॅप्टनशिवाय सदस्यांना चालवावं लागलं. आता या आठवड्यातील कॅप्टन्सी पदासाठी बिग बॉसच्या घरात नवा कॅप्टन्सी टास्क खेळावला जाणार आहे. या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांना पापड लाटावे लागणार आहेत.
दोन टीममध्ये हे कॅप्टन्सी कार्य खेळवले जाणार आहे. या कार्यात टीमला पापड लाटायचे आहेत. आणि स्ट्रॅटेजी करून दुसऱ्या टीमचे पापड मोडायचे आहेत. या कॅप्टन्सी कार्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोन टीममध्ये टास्कदरम्यान भांडण होताना दिसत आहे. सुरुवातीला रुचिता आणि दिव्यामध्ये वादावादी होताना दिसत आहे. त्यानंतर करण आणि रुचितामध्ये हाणामारी होते. करण रुचिताला "ए मारते काय...मी पण देऊ का?" असं म्हणत असल्याचं दिसत आहे. आता या टास्कमध्ये कोणती टीम जिंकणार हे पाहणं रंजनकारक असेल.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ओमकार राऊत, प्रभू शेळके, दिव्या शिंदे, अनुश्री माने, रोशन भजनकर, दिपाली सय्यद, सचिन कुमावत, राकेश बापट, आयुष संजीव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोणाचा प्रवास या आठवड्यात संपतो, हे पाहावं लागेल.
Web Summary : A new captaincy task involving papad-making sparks conflict in the Bigg Boss Marathi house. A promo shows Ruchita and Divya arguing, followed by a physical altercation between Karan and Ruchita. Omkar, Prabhu, Divya, and others are nominated for eviction this week.
Web Summary : बिग बॉस मराठी में कप्तानी कार्य के दौरान झगड़ा हुआ। प्रोमो में रुचिता और दिव्या के बीच बहस और फिर करण और रुचिता के बीच हाथापाई दिखाई गई। ओमकार, प्रभु, दिव्या और अन्य सदस्य इस हफ्ते बेघर होने के लिए नामांकित हैं।