Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस'चा दुसरा आठवडाही चांगलाच गाजला. या आठवड्यात राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात मोठा वाद झाल्याचं दिसलं. रुचिता जामदार आणि अनुश्री यांनी राकेशवर विचित्र आरोप केले. ज्यामुळे त्यांना ट्रोलही केलं गेलं. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने या दोघींचीही चांगलीच शाळा घेतली. पण, त्याबरोबरच घरातील आणखी एका सदस्याला रितेशने खडे बोल सुनावले आहेत. टास्क पूर्ण न केल्याने सोनाली राऊतला रितेशने चांगलंच खडसावलं आहे.
दुसऱ्या आठवड्यात घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये बाद झालेल्या सदस्याला शेणाच्या दारात उभं राहायचं होतं. मात्र सोनालीने टास्क पूर्ण करण्यास नकार दिला. बिग बॉसने सांगूनही सोनालीने टास्क पूर्ण केला नाही. त्यामुळे बिग बॉसने सोनालीला थेट नॉमिनेट केलं. यावरुन रितेश सोनालीला भाऊच्या धक्क्यावर ओरडताना दिसणार आहे. रितेश सोनालीला म्हणाला, "सोनाली तुम्ही ठरवलं की शेणाच्या दाराखाली तुम्ही उभं राहणार नाही. तुम्ही आलात कशाला इथे? टास्क खेळायला आलात नाही तुम्ही?". त्यावर सोनाली म्हणाली की "मला जे वाटलं ते मी केलं". त्यानंतर मात्र रितेशचा पारा चांगलाच चढला. तो तिला म्हणाला, "हा अॅटिट्युड घरी ठेवायचा इथे नाही. इथे सगळे सारखे आहेत. यावेळेस नॉमिनेट केलंय पुढच्या वेळेस घराच्या बाहेर काढेन".
दरम्यान, या आठवड्यात एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. गेल्या आठवड्यात कोणीच एलिमिनेट झालं नाही. त्यामुळे या आठवड्यात प्रभू शेळके, रोशन, अनुश्री माने, राधा पाटील, सागर कारंडे, करण सोनावणे, दिपाली सय्यद, दिव्या शिंदे, रुचिता जामदार यापैकी एका सदस्याचा प्रवास संपणार आहे.
Web Summary : Ritesh Deshmukh reprimanded Sonali Raut for refusing a task on Bigg Boss Marathi 6. He warned her about her attitude and potential eviction.
Web Summary : रितेश देशमुख ने बिग बॉस मराठी 6 में सोनाली राउत को टास्क करने से इनकार करने पर फटकार लगाई। उन्होंने उसे उसके रवैये और संभावित निष्कासन के बारे में चेतावनी दी।