Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'च्या पर्वातील पहिला भाऊचा धक्का आज होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातील सदस्यांची चांगलीच कानउघाडणी करताना दिसणार आहे. तन्वी कोलतेला रितेशने चांगलंच सुनावलं आहे. त्याबरोबरच दिपाली सय्यदचेही रितेशने कान टोचले. त्यानंतर रितेश रुचिता जामदार हिलादेखील खडे बोल सुनावणार आहे. भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.
या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून घरातील सदस्यांमध्ये वाद होत असल्याचं दिसत आहे. घरात फक्त रुचिता आणि तन्वी या दोघींचे आवाज ऐकू येतात. काहीही झालं तरी तन्वी आणि रुचिता मोठमोठ्याने बोलून अख्खं घर डोक्यावर घेतात. रुचिताने तर सोनालीसोबत विनाकारण राडा घातला. करणने पावर की घेतल्यानंतर सोनालीशी बोलताना रुचिताची जीभ घसरली होती. त्यानंतरही घरात इतरांशीही रुचिता विनाकारण भांडताना दिसली. आता भाऊच्या धक्क्यावर रितेशने तिचा खरपूस समाचार घेतला आहे.
व्हिडीओमध्ये रितेश रुचिताला म्हणतो, "रुचिता जामदार...मी वाघीण आहे वाघीण... अहो पण महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वत:ला पंजा मारणारी वाघीण बघितली. महाराष्ट्राला वाटलं होतं की तुम्ही या घराचा व्हॉईस(आवाज) व्हाल...पण, तुम्ही सध्या घरातील फक्त एक नॉइस (गोंधळ) आहात. रितेशने कानउघाडणी केल्यानंतर रुचिताच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसले.
दरम्यान, बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या आठवड्यात रुचिता जामदार, दिपाली सय्यद, करण सोनावणे, प्रभू शेळके, अनुश्री माने, राधा पाटील, रोशन, दिव्या शिंदे आणि सागर कारंडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोण घराच्या बाहेर जाईल हे पाहावं लागेल.
Web Summary : Ritesh Deshmukh criticized Ruchita Jamdar on Bigg Boss Marathi 6 for her loud behavior and unnecessary arguments. He said she has become a noise instead of a voice. Ten contestants are nominated this week.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में रितेश देशमुख ने रुचिरा जामदार को उनके ऊंचे व्यवहार और अनावश्यक तर्कों के लिए फटकार लगाई। उन्होंने कहा कि वह आवाज बनने की बजाय शोर बन गई हैं। दस प्रतियोगी इस सप्ताह नामांकित हैं।