Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६' हे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या सीझनप्रमाणे यंदाच्या बिग बॉस मराठीचा होस्टही रितेश देशमुखच असणार आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये रितेशच्या भाऊच्या धक्क्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख स्पर्धकांची शाळा घेताना दिसला. काही स्पर्धकांचं कौतुक झालं तर काहींचे खरे चेहरे रितेशने समोर आणले. पण स्पर्धकांवर रागावल्यानंतर मात्र रितेशला त्याच्या आईसाहेबांकडून ओरडा खावा लागला होता. लोकमत फिल्मीशी संवाद साधताना याचा खुलासा रितेशने केला आहे.
'बिग बॉस मराठी ५' या सीझनला कुटुंबीयांकडून काही सल्ला मिळाला होता का? असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना तो म्हणाला, "खरं तर असा सल्ला कोणी दिला नाही. पण, पहिल्या सीझनमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा रागावलो होतो तेव्हा माझ्या आईंना फार त्रास झाला होता. तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की काय केलंस तू... असं कोण बोलतं का? मग मी त्यांना सांगितलं होतं की तसं करावं लागतं. पण मी तसं वागलेलं माझ्या आईंना आवडत नाही. आपण असं करू शकत नाही. तू असं बोललं नाही पाहिजे, असं त्या म्हणाल्या होत्या. मग तसे एपिसोड आले की मी आईंना म्हणतो की हा एपिसोड पाहू नका".
'बिग बॉस मराठी ६' हा सीझन येत्या ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ५'नंतर या नव्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. कलर्स मराठीवर रात्री ८ वाजता प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी ६' हा नवा सीझन पाहता येणार आहे.
Web Summary : Ritesh Deshmukh revealed that his mother scolded him after seeing him angry with contestants on 'Bigg Boss Marathi 5,' saying his behavior was unacceptable. Bigg Boss Marathi 6 starts January 11th.
Web Summary : रितेश देशमुख ने बताया कि 'बिग बॉस मराठी 5' में प्रतियोगियों पर गुस्सा होने के बाद उनकी माँ ने उन्हें डांटा और कहा कि उनका व्यवहार अस्वीकार्य है। बिग बॉस मराठी 6, 11 जनवरी से शुरू होगा।