Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या घरात मोठा धमाका झाला आहे. रविवारी भाऊच्या धक्क्यावर घरात एकाच वेळी तीन नवीन सदस्यांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. अभिनेता संकेत पाठक, अभिनेत्री रेवा कौरासे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संस्कृती साळुंखे यांनी बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. घरात एन्ट्री घेताच रेवाने थेट रुचिताशीच पंगा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
बिग बॉसच्या घरातून नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रेवा आणि रुचिता एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. रेवा रुचिताला म्हणते, "बाहेर लोकांचं असं झालंय की रुचिताला बंद करा यार...आवाज नाही ऐकायचाय हिचा...". त्यावर रुचिता तिला म्हणते की "पण मी तुला विचारलंच नाहीये. आली मोठी शहाणी". त्यानंतर रेवा तिला सांगते की "हे सगळं करून तू छान दिसत नाहीयेस". मग रुचिताचा पारा आणखीनच चढतो. "मी चांगली दिसतेय की वाईट हे मी तुला विचारत नाहीये", असं ती म्हणते. रेवा तिचा हात धरून तिला समजवायला गेल्यानंतर रुचिताला राग अनावर होतो. ती रागात रेवाला म्हणते, "मला हात लावू नकोस...get lost".
बिग बॉसच्या घरात तीन वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यानंतर आता पुन्हा घरातील समीकरणं बदलताना दिसतील. टोळीमध्ये पडलेल्या फूटीचा हे नवे सदस्य फायदा घेतील का? त्यांच्या एन्ट्रीमुळे घरातील गेम कसा बदलेल? हे पाहणं आता रंजनकारक ठरणार आहे.
Web Summary : New wildcard entrants shook Bigg Boss Marathi. Reva clashed with Ruchita immediately, leading to a heated argument where Ruchita told Reva to 'get lost' after Reva touched her. The dynamics in the house are expected to change.
Web Summary : बिग बॉस मराठी में नए वाइल्डकार्ड प्रतियोगियों से हलचल। रेवा की रुचिता से तत्काल झड़प हो गई, जिसके कारण तीखी बहस हुई और रुचिता ने रेवा को 'गेट लॉस्ट' कहा। घर में समीकरण बदलने की उम्मीद है।