Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड म्हणून राखी सावंतने एन्ट्री घेतली आहे. घरात एन्ट्री घेताच राखीने ड्रामा सुरू केला आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राखी घरातील सदस्यांना उलट उत्तर देत असल्याचं दिसत आहे. तर राखीसमोर स्मार्टगिरी करणाऱ्या अनुश्री मानेला अभिनेत्री चांगलंच सुनावल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. हा प्रोमो पाहून खरं तर चाहतेही खूश झाले आहेत.
प्रोमोमध्ये दिसतंय की घरातील सदस्य आणि राखी सावंत गार्डन एरियामध्ये बसले आहेत. कॅप्टन सागर कारंडे राखीला विचारतो की "राखी तू सांगितलं नाहीस की कोणती ड्युटी करणार?". त्यावर राखी त्याला सांगते की "मी फक्त दोन ड्युटी करणार...जेवायची आणि झोपायची". मग अनुश्री तिला म्हणते "मग तू माझ्यासोबत जेवण बनव". ओव्हरस्मार्टनेस दाखवणाऱ्या अनुश्रीला राखी म्हणते "तू मला शिकवू नकोस". त्यानंतर घरातील सदस्यांसोबत राखी बोलताना दिसत आहे. "आज मी सती सावित्री आहे... उद्यापासून मी गांधारी होणार आहे. एका एकाला उडवून बाहेर काढेन". त्यानंतर राखी करण आणि राकेश बापटला स्विमिंगपूलमध्ये ढकलत असल्याचं दिसत आहे.
राखी याआधी बिग बॉस मराठीच्या चौथ्या आणि पाचव्या पर्वात दिसली होती. बिग बॉस हिंदीमध्येही ती सहभागी झाली होती. आता राखी घरातील सदस्यांना सळो की पळो करून सोडणार आहे, यात शंका नाही. पण राखीच्या येण्याने घरातील खेळ कसा बदलतो आणि सदस्य याचा कसा फायदा करून घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Summary : Rakhi Sawant's wild card entry into Bigg Boss Marathi 6 ignites drama. She clashes with Anushree, warning her against being overly smart. Rakhi declares her intentions to shake up the house, promising a wild ride.
Web Summary : राखी सावंत की बिग बॉस मराठी 6 में वाइल्ड कार्ड एंट्री से ड्रामा शुरू हो गया है। उन्होंने अनुश्री के साथ बहस की और उसे ज्यादा स्मार्ट बनने के खिलाफ चेतावनी दी। राखी ने घर को हिला देने के इरादे की घोषणा की।