Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'च्या चाहत्यांना धक्का, टोळीमधली 'ती' व्यक्ती होणार एलिमिनेट? सदस्याचं नाव समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:55 IST

या आठवड्यात एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. भाऊचा धक्का होण्याआधीच त्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. या स्पर्धकाच्या एक्झिटने चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरातील टोळीमधली एक व्यक्ती एलिमिनेट होणार आहे. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस'चा दुसरा आठवडाही चांगलाच गाजला. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. तर या आठवड्यात एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. भाऊचा धक्का होण्याआधीच त्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. या स्पर्धकाच्या एक्झिटने चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरातील टोळीमधली एक व्यक्ती एलिमिनेट होणार आहे. 

गेल्या आठवड्यात कोणीच एलिमिनेट झालं नाही. त्यामुळे या आठवड्यात प्रभू शेळके, रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील, सागर कारंडे, करण सोनावणे, दिपाली सय्यद, दिव्या शिंदे, रुचिता जामदार या सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. घरात दोन ग्रुप झाले आहेत. त्यापैकी विशाल कोटियनच्या ग्रुपला टोळी असं नाव पडलं आहे. या आठवड्यात टोळीतीलच एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. तर दुसऱ्या ग्रुपमधील सर्व सदस्य सेफ असणार आहेत. टोळीमधील रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील आणि रुचिता जामदार हे सदस्य नॉमिनेटेड आहेत. यापैकी राधा पाटील हिला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. एका इन्स्टाग्राम पेजवरुन याबाबत अपडेट शेअर करण्यात आली आहे. 

आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातून खरंच राधा पाटील या आठवड्यात नॉमिनेट होणार का, हे येत्या रविवारी भाऊच्या धक्क्यावर कळेल. पण, राधा पाटील किंवा रोशन भजनदार यापैकी कोणाला तरी 'बिग बॉस'चं घर सोडावं लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. नॉमिनेटेड असलेल्या इतर सदस्यांपैकी या दोघांचा गेम तितकासा चांगला नव्हता. रोशनने दुसऱ्या आठवड्यात टास्कमध्ये त्याचा खेळ दाखवला. मात्र राधा तिचा खेळ दाखवण्यात थोडीशी कमी पडली. त्यामुळे कदाचित तिला या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागू शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi: Shocking elimination! A member from the group exits.

Web Summary : Bigg Boss Marathi 6 sees a potential elimination from Vishal Kotian's group. Radha Patil is rumored to be leaving, though Roshan Bhajankar is also at risk due to weaker gameplay. The official announcement awaits Sunday's episode.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार