Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा तन्वी कोलतने गाजवला. आता दुसऱ्या आठवड्यात घरात फक्त अनुश्री माने हिचा आवाज ऐकू येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच राकेश बापट आणि अनुश्रीमध्ये भांडण झालं होतं. त्यांच्यात टोकाचा वाद झाल्यानंतर अनुश्रीने राकेशवर गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर नुकतंच 'बिग बॉस मराठी'च्या घरात राशन टास्क पार पडला. या टास्कनंतर अनुश्री आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात भांडण झालं.
घरातील काम करण्यावरुन प्राजक्ताने अनुश्रीला विचारलं. यावरुन झालेल्या वादात प्राजक्ता अनुश्रीला मंद, बावळट असं म्हणाला. तिला उत्तर देताना अनुश्रीने प्राजक्ताला थेट शिव्याच दिल्या. त्यानंतर दिपाली सय्यद तिला याबाबत विचारायला आल्या तेव्हा अनुश्री मी मला शिव्या दिल्या असं म्हणाली. राकेश बापटच्या प्रकरणावरुन इंडस्ट्रीतील कलाकारांनी अनुश्रीवर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात नॅशनल टीव्हीवर शिवीगाळ केल्याने अनुश्री पुन्हा ट्रोल होत आहे.
अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर हिने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये अनुश्रीच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. "कोण आहे ही अनुश्री? काय बोलतेय उगाच फालतू बडबड... आणि कुणाला मतिमंद बोलतेय...सगळं बोलतेय...शिव्या देतेय आणि परत विचारल्यावर बोलते मी मला शिव्या देत होती", असं प्रतिक्षाने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख याबाबत अनुश्री मानेची कानउघाडणी करणार का हे पाहावं लागेल.
Web Summary : Anushree's behavior in Bigg Boss Marathi, including abusive language, has drawn criticism. Actress Pratiksha Mungekar expressed her anger on Instagram, questioning Anushree's behavior and choice of words. The show may address this issue.
Web Summary : बिग बॉस मराठी में अनुश्री के गाली-गलौज से विवाद खड़ा हो गया है। अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर ने इंस्टाग्राम पर गुस्सा व्यक्त करते हुए अनुश्री के व्यवहार और शब्दों पर सवाल उठाए। शो में इस मुद्दे पर बात हो सकती है।