Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'चा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतची घरात एन्ट्री झाल्यामुळे आता फूल एंटरटेनमेंट पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला घरात कॅप्टन्सीसाठी पॉवर की मिळवण्याचा टास्क खेळवला गेला. त्यानंतर आता घरात या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे.
कलर्स मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया हँडलवरुन एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सदस्य एकेमकांचे दात घालणार घश्यात असे बिग बॉस सांगताना दिसत आहेत. या नॉमिनेशन कार्यादरम्यान वातावरण प्रचंड तापणार आहे. आजच्या टास्कमध्ये फक्त नावं नाही, तर सदस्यांची खरी मतं, जुने राग आणि आतापर्यंत लपवलेली भूमिका सगळं उघड होणार आहे. कोणाला हा टास्क आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घ्यायला भाग पाडणार? कोण नॉमिनेट होणार? आणि कोण सेफ हे आजच्या भागात कळेल.
एका निर्णयामुळे घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता असून, मैत्री, आघाड्या आणि विश्वास यांची कसोटी लागणार आहे. काही सदस्यांसाठी हा टास्क रणनीतीचा खेळ ठरणार, तर काहींसाठी भावनांचा उद्रेक. टोमणे, आरोप-प्रत्यारोप आणि दबलेल्या भावना यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण होणार आहे. नॉमिनेशन कार्यानंतर कोण सुरक्षित राहणार, कोण धोक्याच्या क्षेत्रात जाणार आणि कोणाचा मुखवटा गळून पडणार? हे पाहावं लागेल.
Web Summary : Rakhi Sawant's entry promises entertainment as Bigg Boss Marathi 6 enters week five with a nomination task. Tensions rise as housemates reveal true feelings, old grudges, and hidden agendas. Alliances will be tested, and strategies will be revealed, determining who is safe and who faces danger.
Web Summary : राखी सावंत की एंट्री मनोरंजन का वादा करती है क्योंकि बिग बॉस मराठी 6 नामांकन कार्य के साथ पांचवें सप्ताह में प्रवेश कर रहा है। घरवाले सच्ची भावनाओं, पुराने द्वेष और छिपे हुए एजेंडे को प्रकट करते ही तनाव बढ़ जाता है। गठबंधनों का परीक्षण किया जाएगा, और रणनीतियों का खुलासा किया जाएगा, जिससे यह निर्धारित होगा कि कौन सुरक्षित है और किसे खतरे का सामना करना पड़ता है।