Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6: "मला फक्त त्यांचा आवाज ऐकायचा आहे..."; करण सोनावणेला आली 'या' व्यक्तीची आठवण, झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:20 IST

कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी' चा नवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील वाद आणि टास्कसोबतच आता स्पर्धकांचे भावनिक पैलूही समोर येऊ लागले आहेत.

कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी' चा नवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील वाद आणि टास्कसोबतच आता स्पर्धकांचे भावनिक पैलूही समोर येऊ लागले आहेत. बिग बॉसच्या घरात आपल्या माणसांची आठवण येणं हे साहजिक आहे. घरातील सदस्य करण आपल्या आई-वडिलांच्या आठवणीने कमालीचा भावूक झालेला पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?दिपाली कारणची विचारपूस करताना दिसणार आहे, कसं वाटत आहे बिग बॉसच्या घरात ? बरं वाटतं आहे ना? करणने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मला मध्ये मध्ये आई बाबांची आठवण येते. मला फक्त त्यांचा आवाज ऐकायचा आहे. जाणून घ्यायचं आहे ते ठीक आहेत ना ? त्यांचं जग माझ्या अवतीभवती फिरते.मी घरी असताना सतत असणारी लोकांची ये-जा, रिल्स बनवणं आणि आई-बाबांचा सहवास यामुळे घर नेहमी गजबजलेलं असायचं, जे आता तासन नसणार आहे.  माझी एक छोटी इच्छा: "मला फक्त एकदा त्यांचा आवाज ऐकायचा आहे, ते ठीक आहेत ना हे जाणून घ्यायला १० सेकंद मिळाले तरी पुरेसे आहेत," 

बिग बॉसच्या घरात जिथे नेहमी डावपेच आणि वादाचे वातावरण असते, तिथे करणचा हा संवेदनशील अवतार प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे. आपल्या लाडक्या स्पर्धकाची ही बाजू पाहून चाहतेही भावूक झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’, रात्री ८:०० वा कलर्स मराठी आणि JioHotstar वर पाहता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi 6: Karan Sonawane misses family, gets emotional.

Web Summary : Karan Sonawane, a Bigg Boss Marathi 6 contestant, became emotional missing his parents. He expressed his longing to hear their voices and ensure their well-being amidst the game's challenges. He misses the lively atmosphere of his home.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६कलर्स मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार