Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane Journey Ends : 'बिग बॉस मराठी ६' मध्ये काल धक्कादायक एविक्शन झालं. आयुष संजीव आणि करण सोनावणे घराबाहेर गेले. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय. भाऊचा धक्क्यावर काल रितेश देशमुखने या आठवड्यात डबल एविक्शन होणार, असा खुलासा केला होता. त्यामुळे नॉमिनेट असलेल्या सहा सदस्यांपैकी करण आणि आयुष यांचा 'बिग बॉस मराठी ६'मधील प्रवास संपला. करण सोनावणे घरातील एक स्ट्राँग स्पर्धक होता. परंतु कमी मतं मिळाल्याने करण सोनावणेला 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर जावं लागलं. घराबाहेर आल्यावर करण सोनावणेनं पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानलेत. तसेच "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..." असे म्हणत चाहत्यांना कोड्यातही टाकलं आहे.
करणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बिग बॉसमधील त्याचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. करणने लिहिले, "भाऊचा अंतिम धक्का, बिग बॉसचा प्रवास इथेच संपला. यंदा ट्रॉफी ठाण्याला येत नाहीये... तोपर्यंत आपण सर्वजण 'मॅजिक'वर विश्वास ठेवूया. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे मनापासून आभार".
"पिक्चर अभी बाकी है..."मात्र, चाहत्यांना निरोप दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच करणने आणखी एक स्टोरी शेअर केली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. या दुसऱ्या स्टोरीत त्याने प्रसिद्ध डायलॉग "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..." असे लिहिले आहे. आता करणच्या या पोस्टमुळे तो नक्की काय धमाका करणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
कोण आहेत करण?
फोकस इंडियन या नावाने करण सोनावणे इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. करणचं सोनावणे वहिनीच्या लूकमधील रिलही चांगलंच व्हायरल झालं आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला करण गेल्या काही वर्षात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. करणचे अनेक रिल चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. करणने भारताचे क्रिकेट सामने आणि IPL मधील मुंबई इंडियन्स संघातील क्रिकेटपटूंसह रिल केले आहेत.
Web Summary : Karan Sonawane's Bigg Boss Marathi journey ended in a shocking double eviction. He thanked fans and hinted at future projects with the line, "Picture abhi baaki hai mere dost..."
Web Summary : करण सोनावणे का 'बिग बॉस मराठी' का सफर डबल एविक्शन में समाप्त हुआ। उन्होंने प्रशंसकों को धन्यवाद दिया और भविष्य की परियोजनाओं का संकेत दिया, "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..."