Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्यात चाहत्यांना आणि घरातील सदस्यांनाही मोठा धक्का मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर दोन सदस्यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली आहे. या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्याचं रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर शनिवारी सांगितलं होतं. त्यानंतर सचिन कुमावत, आयुष संजीव आणि करण सोनावणे हे सदस्य डेंजर झोनमध्ये होते. यातील करण आणि आयुषला घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. ज्यामुळे चाहत्यांसोबत घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
आयुषसोबत करण बाहेर जाईल ही अपेक्षा चाहत्यांनी केली नव्हती. त्यामुळे करणच्या एक्झिटनंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. करणचं एलिमिनेशन योग्य नसल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. करण ऐवजी सचिन कुमावतला घराबाहेर काढायला हवं होतं असंही काहींनी म्हटलं आहे. "सचिन, आयुष एव्हिक्ट व्हायला हवे होते", "सचिनपेक्षा जास्त दिसून पण करण भाऊला घराबाहेर काढलं...हे काय बरोबर नाही", "एकदम चुकीचं आहे" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, घराबाहेर येताच करण सोनावणेने पोस्ट शेअर केली आहे. "भाऊचा फायनल धक्का, मॅजिकवर विश्वास ठेवा", अशा आशयाची पोस्ट त्याने केली आहे. तर "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त", अशी एक पोस्टही करणने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे.
Web Summary : Karan Sonawane's eviction from Bigg Boss Marathi 6 shocked viewers. Fans express disappointment, deeming it unfair. Many believed Sachin Kumawat should have been eliminated instead. Karan hints at a possible return.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 से करण सोनावणे के निष्कासन ने दर्शकों को चौंका दिया। प्रशंसकों ने निराशा व्यक्त की, इसे अनुचित बताया। कई लोगों का मानना था कि सचिन कुमावत को बाहर किया जाना चाहिए था। करण ने संभावित वापसी का संकेत दिया।