Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6: आता खरी मजा येणार! ड्रामा क्वीन राखी सावंत 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:39 IST

Rakhi Sawant in Bigg Boss Marathi 6: आता बिग बॉस मराठीच्या घरात आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धमाका होणार आहे. या पर्वात पुन्हा एकदा राखी सावंतची एन्ट्री होणार असल्याचं कळत आहे. 

Bigg Boss Marathi 6 Wild Card Entry: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनचा चौथा आठवडा सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच या पर्वात गेममध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात गेलेले अनेक स्पर्धक हादेखील चाहत्यांसाठी धक्काच होता. मात्र आता बिग बॉस मराठीच्या घरात आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धमाका होणार आहे. या पर्वात पुन्हा एकदा राखी सावंतची एन्ट्री होणार असल्याचं कळत आहे. 

राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, राखी या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेईल. पण राखी बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार नाहीये. तर ती केवळ १५ दिवसासांठी म्हणजेच दोन आठवडे 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे पाहुणी कलाकार म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात गेलेली राखी सावंत घरातील सदस्यांना पळो की सळो करून सोडणार, यात काहीच शंका नाही. 

याआधीही 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या आणि पाचव्या सीझनमध्ये राखी दिसली होती. 'बिग बॉस मराठी ४' मध्ये तिने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. तर 'बिग बॉस मराठी ५'मध्ये ती पाहुणी कलाकार म्हणून आली होती. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये राखीने निक्की तांबोळीला चांगलाच त्रास दिला होता. तर 'बिग बॉस हिंदी १' आणि 'बिग बॉस १४' या दोन पर्वातही राखी होती. त्यामुळे आता पुन्हा राखीच्या एन्ट्रीमुळे बिग बॉस मराठीचा खेळा आणखी रंगणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rakhi Sawant to spice up Bigg Boss Marathi season 6!

Web Summary : Drama queen Rakhi Sawant is entering Bigg Boss Marathi 6 as a guest for two weeks. She previously appeared in seasons 4 and 5, creating memorable moments. Her entry promises added entertainment.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६राखी सावंतटिव्ही कलाकार