Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी जुन्नरची आहे, आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी तलवार दिली जाते..."; बिग बॉस मधून बाहेर येताच दिव्या शिंदेचं मोठं वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:35 IST

"त्यांनी मला निष्कासित केलं नाही, तर...", बिग बॉस मधून बाहेर येताच दिव्या शिंदे काय म्हणाली?

Divya Shinde Bigg Boss Controversy: छोट्या पद्यावरील सर्वात वादग्रस्त आणि सर्वाधिक बघितवा जाणारा शो म्हणजे बिग बॉस. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.यंदाचं बिग बॉस मराठीचं सहावं पर्व ११ जानेवारीपासून दणक्यात सुरु झालं. आता हा शो सुरु होऊन जवळपास ४ आठवड्यांचा कालावधी लोटला आहे.या कालावधीत बिग बॉसच्या घरात अनेक नाट्यमय घटना घडला. त्यातीलच एक घटना म्हणजे स्पर्धक दिव्या शिंदेंची घरातील एक्झिट. बिग बॉसच्या घरातील सदस्यांना टाक्सदरम्यान तलवार चालवण्याचं वक्तव्य केल्यामुळे तिला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता यावर दिव्याने थेट प्रतिक्रिया दिली आहे. 

दिव्या शिंदेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. बिग बॉसच्या घरात असताना व्होटिंग ट्रेंडनुसार कायम ती आघाडीवर असायची. शिवाय या सीझनची टॉप ५ पैकी एक असेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र,दिव्या घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला. अशातच काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने बिग बॉसबद्दल अनेक खुलासे केले आहेत.यावेळी ती म्हणाली, "मी त्यांना हजार वेळा सांगितलं तुम्हाला माझ्या गोष्टी कळणार नाहीत. पण, तुम्ही जर मला चिड आणताय, मला Poke करतायतआणि तुम्हाला जर ऐकायचं असेल तर  बाहेरच्या जगात मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलावर घेऊन फिरते. याचा अर्थ असा की,मी जुन्नरची आहे. आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी  तलवार दिली जाते. शृंगारच्या आधी स्वाभिमानाने जगणं शिकवलं जातं. स्वाभिमान हा आमच्यासाठी श्वासापेक्षा महत्वाचा आहे. कारण,माझा जन्म शिवनेरीत झालाय. आम्हाला खरी तलवार घेऊन फिरण्याची गरज नाही, कारण आम्ही संविधान असलेल्या देशात राहतो."

पुढे दिव्या म्हणाली,"तुम्ही जर वैचारिक आहात, तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल. तुम्ही जर शा‍ब्दिक असाल तर ती तलवार शा‍ब्दिक  फिरली जाईल. शिवाय तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर ती तलवार स्वाभिमानासाठी फिरवली जाईल. हा त्या शब्दांचा अर्थ आहे. पण, तो अर्थ समजूनच घेतला नाही. आणि अर्धसत्य महाराष्ट्राला सांगितलं जातंय. मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवा. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्काषित करत आहोत. पण, त्यांनी मला निष्काषित  केलं नाही.कन्फेशन रुममध्ये मी माझं मत मांडलं की मला हा शो सोडायचा आहे."

"मी कुणालाही धमकी दिलेली नाही.जे अर्धसत्य महाराष्ट्राला सांगितलं जातंय, त्याचा अर्थ मी काय समजावा. हे खूप घातक आहे. त्यामुळे मी कोणाचीही माफी मागणार नाही. त्यांनी ती पूर्ण क्लिप दाखवावी." असा खुलासा दिव्याने यावेळी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Divya Shinde exits Bigg Boss, defends sword comment, reveals truth.

Web Summary : Divya Shinde's Bigg Boss exit sparks controversy over a sword remark. Divya clarifies she referenced Junnar's tradition, not violence. She asserts self-respect is paramount, denies threatening anyone, and demands the full clip be shown, refusing to apologize for her statement.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनसेलिब्रिटी