Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासू गेल्याचं समजताच दिपाली सय्यद नवऱ्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली, भावुक करणारा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:49 IST

दिपाली सय्यदचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरात येणार आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मध्ये या आठवड्याच फॅमिली वीक साजरा केला जाणार आहे. या वीकमध्ये स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात येणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील हा आठवडा स्पेशल असणार आहे. कालच्या भागात संकेत पाठकची पत्नी त्याला भेटायला आली होती. आज दिपाली सय्यदचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरात येणार आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

या व्हिडीओमध्ये दिपाली सय्यदचा पती आणि मुलगा घरात एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे. त्यांना पाहून दिपालीला अश्रू अनावर होतात. दिपाली तिच्या नवऱ्याला सासूबद्दल विचारते. "मम्मी कशी आहे", असं विचारताच दिपालीच्या पतीला अश्रूला अनावर होतात. सासू गेल्याचं कळल्याने दिपालीला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. दिपाली नवऱ्याला मिठी मारून ढसाढसा रडत आहे. बिग बॉसच्या घरातील या भावुक करणाऱ्या व्हिडीओने प्रेक्षकांचे डोळेही पाणावले आहेत. 

बिग बॉसच्या घरात आल्यानंतर काही दिवसांनी दिपालीच्या सासूचं निधन झालं होतं. २ फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं. बिग बॉसच्या घरात जाताना तिने सासूला ट्रॉफी घेऊन आले की भेटू सांगितले होते. दीपालीचा गेम चांगला सुरू असल्याने कुटुंबीयांनी तिला याबाबत काही कळू दिले नाही.  आणि जर तिच्या पर्यंत ही दुःखद बातमी पोहचली तर ती खचून जाईल आणि बाहेर येईल, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता सासूबाईंच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर दिपालीच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी ६दीपाली सय्यदटिव्ही कलाकार