Bigg Boss Marathi 6 Contestants: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या नवीन पर्वात कोण सहभागी होणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यंदाच्या घरात केवळ कलाकार नाही, तर राजकारणातील 'धुरंधर' आणि सोशल मीडिया स्टार्सदेखील एन्ट्री घेत आहेत. आता 'कलर्स मराठी'च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरुन या स्पर्धकांचे प्रोमो शेअर करण्यात आले असून या स्पर्धकांच्या नावावरुन पडदा हटायला सुरुवात झाली आहे.
पहिल्या प्रोमोमध्ये एक तरुण 'बाला... बाला...' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या सादरीकरणामध्ये त्याने 'रिंग लाईट' या प्रॉपचा वापर केल्याने तो प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत हा स्पर्धक दुसरा कोणी नसून करण सोनवणे असल्याचा दावा केला आहे. करणच्या 'सोनवणे वहिनी' या पात्राचे अनेक चाहते असून "आता सोनवणे वहिनी बिग बॉसच्या घरात राडा करणार", अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
तर दुसऱ्या प्रोमोमध्ये दरवाजात कार्यकर्ते उभे असून एका राजकीय नेत्याची एन्ट्री दाखवली आहे. "राजकीय वर्तुळात तर खूप भूकंप केलेत, आता बिग बॉस मराठीच्या घरात ब्लास्ट करण्यासाठी हा धुरंधर येतोय! ओळखलंत का त्याला?", असं सूचक कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
खरं तर हा Aiने बनवलेला प्रोमो आहे. पण तरीदेखील चाहत्यांनी या प्रोमोमधली व्यक्ती ओळखली आहे. या प्रोमोच्या कमेंट सेक्शनमध्ये ही व्यक्ती कोण असेल याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. काहींनी गुणरत्न सदावर्ते यांचं नाव घेतलं आहे. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी 'बिग बॉस १८'मध्येही सहभाग घेतला होता. त्यामुळे 'मराठी बिग बॉस'मध्ये त्यांची एन्ट्री झाल्यास घरातील समीकरणे नक्कीच बदलतील. दरम्यान, 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व ११ जानेवारीपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी ६' पाहता येणार आहे.
Web Summary : Bigg Boss Marathi 6 is generating buzz with potential contestants. Promos reveal a social media influencer, possibly Karan Sonawane, and a politician entering the house. The show starts January 11th.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 संभावित प्रतियोगियों के साथ चर्चा में है। प्रोमो से पता चलता है कि एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर और एक राजनेता घर में प्रवेश कर रहे हैं। शो 11 जनवरी से शुरू होगा।