सध्या 'बिग बॉस' हिंदीचा १९ वा सीझन चांगलाच गाजतोय. मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, अभिनेता गौरव खन्ना, फरहाना, अश्नूर कौर, मालती चहर, तान्या मित्तल या स्पर्धकांमुळे 'बिग बॉस १९' ला चाहत्यांची पसंती मिळतेय. हा सीझन आता अखेरच्या टप्प्यात असताना 'बिग बॉस मराठी ६'चे संकेत प्रेक्षकांना मिळाले आहेत. कलर्स मराठीने एक धमाकेदार प्रोमो शेअर केला आहे. त्यामुळे 'बिग बॉस मराठी ६' लवकरच सुरु होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कलर्स मराठीने शेअर केला धमाकेदार प्रोमो
कलर्स मराठी चॅनलने त्यांच्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला. 'उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येतंय', अशी घोषणा या व्हिडीओत दिसतंय. याशिवाय 'सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचणार, उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येणार!', असं खास कॅप्शन या व्हिडीओखाली देण्यात आलंय. हा व्हिडीओ शेअर होताच 'बिग बॉस मराठी ६' प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ६'साठी उत्सुक आहेत. कलर्स मराठीने केलेली ही घोषणा नेमकी कशाची आहे, हे आज स्पष्ट होईल.
'बिग बॉस मराठी ६'चं होस्टिंग कोण करणार?
'बिग बॉस मराठी ६' सुरु झाल्यास या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन कोण करणार, असा सर्वांना प्रश्न आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या चार सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. महेश यांनी केलेलं सूत्रसंचालन चांगलंच गाजलं. पुढे 'बिग बॉस मराठी ५'चं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुखने केलं. रितेशची खास शैलीही प्रेक्षकांना आवडली. त्यामुळे 'बिग बॉस मराठी ६'चं सूत्रसंचालन महेश मांजरेकर की रितेश देशमुख यापैकी कोण करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. याशिवाय 'बिग बॉस मराठी ६'ला नवीन होस्ट असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
Web Summary : कलर्स मराठी के प्रोमो ने 'बिग बॉस मराठी 6' की झलक दिखाई। मेजबान को लेकर अटकलें, महेश मांजरेकर या रितेश देशमुख? प्रशंसकों को आधिकारिक घोषणा का बेसब्री से इंतजार।
Web Summary : कलर्स मराठीच्या प्रोमोमुळे 'बिग बॉस मराठी ६' लवकरच सुरु होण्याची शक्यता. सूत्रसंचालक कोण? महेश मांजरेकर की रितेश देशमुख? चाहते उत्सुकतेने प्रतीक्षेत.