Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मध्ये यंदाचा आठवडा खास ठरला. या आठवड्यात फॅमिली वीक साजरा केला गेला. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटायला आले होते. आता फॅमिली वीक झाल्यानंतर 'बिग बॉस'च्या घरातून या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशन झाल्याचं पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातून छोटा डॉन बाहेर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सुरुवातीपासूनच काळू डॉन म्हणवणाऱ्या प्रभू शेळकेने बिग बॉस मराठीच्या घरात गेम खेळायला सुरुवात केली होती. तन्वी कोलतेसोबत त्याची चांगली मैत्रीही झाली होती. टास्कमध्येही छोटा डॉनने त्याची पॉवर दाखवली होती. मात्र आता त्याला घरातून एक्झिट घ्यावी लागणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉस मराठीचे अपडेट्स देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन या आठवड्यात प्रभू शेळके घराबाहेर जाणार असल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत.
प्रभू हा बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांपैकी एक स्ट्राँग स्पर्धक मानला जात होता. प्रभूने त्याचा गेमही चांगला केला होता. मात्र आता त्याला घरातून बाहेर जावं लागणार असल्याचं बोललं जात आहे. फॅमिली वीकनंतर खेळात हा मोठा बदल झाल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रभूने घरातून एक्झिट घेतली तर तो घरातील सदस्यांसाठीही मोठा धक्का असणार आहे.
Web Summary : Bigg Boss Marathi witnesses a twist as Prabhu Shelke, aka Kalu Don, is rumored to be eliminated. This potential exit after family week could significantly impact house dynamics. Shelke was considered a strong player.
Web Summary : बिग बॉस मराठी में ट्विस्ट! प्रभु शेळके उर्फ कालु डॉन के बाहर होने की अफवाह है। फैमिली वीक के बाद यह संभावित एग्जिट घर के समीकरणों को बदल सकती है। शेळके को मजबूत खिलाड़ी माना जा रहा था।