Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या या नव्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच प्रचंड वादावादी सुरू असल्याचं दिसत आहे. पहिला आठवडा तन्वीने गाजवला. आता दुसऱ्या आठवड्यात अनुश्रीने घर डोक्यावर घेतलं आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अनुश्री राकेश बापटसोबत भांडली. आता तिने घरात ड्युटी करण्यावरुन कॅप्टन असलेल्या प्राजक्ता शुक्रेसोबत वाद घातला आहे. बिग बॉसच्या घरातील नवा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये दिसतंय की प्राजक्ता गार्डन एरियामध्ये बसलेल्या अनुश्रीला ड्युटी करण्यास सांगते. "मी ड्युटी नाही करणार", असं अनुश्री प्राजक्ताला बोलते. त्यानंतर प्राजक्ताचाही पारा चढतो. ती अनुश्रीला म्हणते की "काय मुर्ख आहे ही...". अनुश्रीला राग अनावर होऊन ती प्राजक्ताला "हो मी मुर्ख आहे तुझ्यासारखी...", असं म्हणत शिवीगाळ करते. त्यानंतर प्राजक्ता किचनमध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगत म्हणते की अनुश्रीने मला शिव्या दिल्या. मग दिपाली सय्यद याबाबत अनुश्रीला विचारतात की "तू शिव्या देतेस का?" ते पाहून अनुश्रीचा पारा आणखीनच चढतो. ती प्राजक्ताला म्हणते की "आईला घेऊन आलीस तू...". दिपाली सय्यदचा केलेला अपमान पाहून प्राजक्ता भडकते आणि अनुश्रीला म्हणते, "बावळट तुला अक्कल आहे का..." मग अनुश्रीही तिला उत्तर देत म्हणते की "नाहीये मला अक्कल...आता पप्पाला घेऊन येईल".
याआधी राकेश बापटसोबत झालेल्या भांडणामध्येही अनुश्री मानेने शिव्या दिल्या होत्या. आता यावर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख अनुश्रीला जाब विचारणार का हे पाहावं लागेल. पण, बिग बॉसच्या घरातील अनुश्रीचं वागणं पाहून चाहते मात्र भडकले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. "दिसण्यासाठी धडपड...फक्त वायफळ कारण पाहिजे", "हिचा अहंकार खूपच वाढलाय असं वाटतंय", "अनुश्रीला बाहेरचा रस्ता दाखवा", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
Web Summary : Anushree Mane and Prajakta Shukre engaged in a heated argument over household duties in Bigg Boss Marathi 6. Anushree also insulted Deepali Sayyad, leading to further conflict. Viewers criticize Anushree's behavior.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में अनुश्री माने और प्राजक्ता शुक्रे के बीच घरेलू काम को लेकर तीखी बहस हुई। अनुश्री ने दीपाली सय्यद का भी अपमान किया, जिससे और विवाद बढ़ गया। दर्शकों ने अनुश्री के व्यवहार की आलोचना की।