Bigg Boss Marathi Season 6: 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे. एका आठवड्यानंतर घरातील सदस्यांच्या स्वभावाबद्दल आता थोडीफार प्रेक्षकांना देखील कल्पना येऊ लागली आहे. अलिकडेच बिग बॉसच्या घरात मोठा वाद बघायला मिळाला. घरात अनुश्री माने हिने राकेशने माझा हात खेचला, मला परवानगीशिवाय कोणीही हात लावू शकत नाही, असं वक्तव्य केलं. या विचित्र आरोपांमुळे राकेश बापट खूप दुखावला गेलाय. यामुळे घरातील इतर सदस्यांनी अनुश्रीला चांगलेच खडेबोल सुनावले. आता याप्रकरणी सोशल मीडियावर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक कलाकार मंडळी राकेश बापटच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत.
दरम्यान, राकेशच्या चाहत्यांनी हा हॅशटॅग ट्रेंड करत अभिनेत्याला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची उपविजेती, अभिनेत्री नेहा शितोळे हिने देखील राकेशची बाजू घेत या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. नेहा शितोळेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत त्यामध्ये लिहिलंय,"राकेश बापट या प्रकरणात मी तुझ्यासोबत आहे. माझा तुला पाठिंबा आहे. या मुली अत्यंत वाईट पद्धतीने गेम खेळत आहे.एक स्त्री म्हणून मी तुझी माफी मागते. हे अजिबातच योग्य नाही." अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.
नेमकं काय घडलेलं?
खरंतर,अनुश्री राकेशच्या बेडवर जाऊन झोपली होती. प्रकृती ठीक नसल्याने, तू इथून उठ आणि दुसरीकडे जाऊन झोप अशी विनवणी राकेशने तिला केली. इतकंच नाहीतर राकेशने घरातील इतर महिला स्पर्धकांना सांगून तुम्ही अनुश्रीला उठवा, असं म्हणाला होता. मात्र, तरीही अनुश्री काही ऐकली नाही. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं.
Web Summary : Neha Shitole backed Rakesh Bapat after Anushree's accusation in Bigg Boss Marathi 6. She apologized on behalf of women, condemning Anushree's game.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में अनुश्री के आरोप के बाद नेहा शितोले ने राकेश बापट का समर्थन किया। उन्होंने महिलाओं की ओर से माफी मांगी और अनुश्री के खेल की निंदा की।