Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरला येताच रंगली जेवणाची पंगत, DP ने स्वतःच्या हाताने मित्रांना भरवलं: व्हिडीओ पाहून होतंय कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:14 IST

नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला.

Dhananjay Powar  Video : नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यंदाच्या या पर्वात कलाकारमंडळींसह सोशल मीडिया स्टार्स यांनी धुमाकूळ घातला. या सर्वांमध्ये आपल्या कोल्हापूरी अंदाजाने धनंजय पोवारने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. ठसकेबाज कोल्हापूरी वाणी तसेच विनोदी शैलीमुळे धनंजय चर्चेत आला. अशातच या 'बिग बॉस' मधून बाहेर पडल्यानंतर त्यानं गाव गाठलं आहे. आपल्या मुळगावी पोहचल्यानंतर डीपी त्याचा वेळ मित्रमंडळींसोबत घालवताना दिसतो आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

'बिग बॉस'च्या घरात ७० दिवस राहिल्यानंतर धनंजय त्याच्या गावी गेला आहे. तिथे डीपी त्याच्या मित्रांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतोय. याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर समोर आला आहे.  "७० दिवस बिग बॉसच्या घरी राहिल्यानंतर तुझ्या मैत्रीत फरक पडला नाही", असं कॅप्शन देत धनंजयच्या मित्राने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

व्हिडीओमध्ये धनंजय पोवार त्याच्या मित्रांना प्रेमाने घास भरवताना दिसतो आहे. त्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडीओवर "पैसा प्रेम प्रसिद्धी मिळाली की लोक बदलतात हे चित्र काहीस वेगळं आहे माणसाचं पाय जमिनीवर असणं त्याची नाळ मातीशी जोडणं ह्याची व्याख्या काय असेल तर ते म्हणजे फक्त DP दादा... "अशी कमेंट एका सोशल मीडिया यूजरने डीपीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया