Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजीत सावंतच्या घराबाहेर लागायच्या मुलींच्या रांगा, म्हणाला- "घराची बेल वाजवून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:20 IST

अभिजीतने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याने बालपण, करिअर आणि इंडियन आयडॉलचे अनेक किस्से सांगितले.

Bigg Boss Marathi 5 : महाराष्ट्राचा लाडका गायक आणि इंडियन आयडॉल १चा विजेता अभिजीत सावंत सध्या बिग बॉस मराठीचं घर गाजवत आहे. सुमधूर आवाजाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिजीत बिग बॉसच्या घरातूनही मनं जिंकत आहे. अभिजीतने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याने बालपण, करिअर आणि इंडियन आयडॉलचे अनेक किस्से सांगितले. 

'मोहब्बते लुटाऊंगा...' या गाण्याने चाहत्यांना वेड लावणारा अभिजीत इंडियन आयडॉल या रिएलिटी शोचा पहिला विजेता होता. या शोमुळे अभिजीत घराघरात पोहोचला. त्याला लोकप्रियता मिळाली. इंडियन आयडॉलने अभिजीतला प्रसिद्धीझोतात आणलं होतं. चाहत्यांमध्ये अभिजीत आणि त्याच्या गाण्यांची प्रचंड क्रेझ होती. त्यामुळेच इंडियन आयडॉल संपल्यानंतर अभिजीतच्या घराबाहेर त्याला भेटण्यासाठी चाहत्यांच्या रांगा लागायच्या. अभिजीत तरुणींच्या गळ्यातीलही ताईत बनला होता. त्याची क्रेझ इतकी होती की कॉलेज बंक करून तरुणी थेट त्याला भेटण्यासाठी घरी यायच्या. लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत अभिजीतने याबाबत सांगितलं. 

इंडियन आयडॉलचा विजेता झाल्यानंतर अभिजीत रातोरात स्टार झाला होता. शोनंतर मिळालेल्या अनुभवाबद्दल अभिजीत म्हणाला, "आमचं घर फार छोटं होतं. 1BHK असल्यामुळे कोणीही आलं तरी हॉलमध्येच बसवावं लागायचं. लोक बिनधास्त माझ्या घरी येऊन अभिजीत आहे का, असं विचारायची. घराची बेल वाजली की मी आतमध्ये लपून बसायचो. कधीकधी ग्रुप किंवा मंडळंही भेटायला यायची. कधी कधी कॉलेजमधल्या मुली लेक्चर बंक करून मला भेटायला यायच्या. काही जण लेटरही देऊन जायचे".  

सध्या अभिजीत बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. बिग बॉसच्या घरात गायकाची एक वेगळी बाजू पाहायला मिळत आहे. अभिजीत त्याच्या हुशारीने बिग बॉसच्या घरात गेम प्लॅन आखताना दिसत आहे. त्याचा खेळ चाहत्यांनाही आवडत आहे. 

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठीटिव्ही कलाकार