Join us  

Bigg Boss Marathi 3 updates: अन् जीवाभावाच्या मैत्रिणी कचाकचा भांडल्या...; असं काय घडलं की मीरा व गायत्रीचं  वाजलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 1:11 PM

Bigg Boss Marathi 3 updates: नक्की काय झालं ? एका निर्णयामुळे गायत्री दातार व मीरा जगन्नाथची मैत्री तुटणार ?

बिग बॉस मराठी’च्या तिस-या सीझनमध्ये  (Bigg Boss Marathi 3) सध्या रोज नवा राडा सुरू आहे. होय, आता तर काय जीवाभावाचे लोकही भांडू लागले आहेत. आम्ही बोलतोय ते गायत्री दातार (Gayatri Datar ) व मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) या दोन जिवाभावाच्या मैत्रिणींबद्दल. होय, बिग बॉस मराठी 3 च्या पहिल्या आठवड्यापासून गायत्री व मीरा दोघीही एकत्र खेळताहेत. एकमेकांशिवाय अगदी दोघींचं पानंही हलत नाही. पण एका निर्णयाचं निमित्त झालं आणि गायत्री व मीरा यांच्यात वाजलं.कलर्स मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवर एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यात मीरा व गायत्री कचाकचा भांडताना दिसत आहेत.

टास्कसाठी सगळेच सदस्य सुंदर तयार होऊन सज्ज आहेत... बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना दोन टिम्समध्ये विभागलं आहे म्हणजेच टीम ए आणि टीम बी. कोणती टीम विजयी ठरणार याचा निकाल गायत्री लावणार असं प्रोमोमध्ये दिसतंय.  घरातील सदस्य परफॉर्म करताना दिसत असताना, मला टीम ए ला हा चान्स द्यावा असं वाटतं, असं गायत्री म्हणते. त्यावर मी स्टेज सोडणार नाही... वाचा आधी आणि मग सांगा असं मीरा रागारागात म्हणते आणि गायत्रीचा पारा चढतो. आरडाओरडा कमी कर, बस चल तिकडे, असं गायत्री मीराला सुनावते आणि यानंतर गायत्री व मीराचा वाद वाढत जातो.  नक्की काय झालं हे आजच्या भागामध्ये कळेलच.  या वादानंतर गायत्री व मीराची मैत्री तुटणार का ?  हेही या भागात कळेल. या प्रोमोवर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जे बघायची खूप मनापासून इच्छा होती, ते शेवटी झालंच. छान भांडा हो मीरा व गायत्री,’अशी कमेंट एका चाहत्याने केली. आता मजा येणार, अशी कमेंट्स अनेक चाहत्यांनी केली आहे. हे तर होणारचं होतं, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी दिली आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीगायत्री दातार