Join us  

Bigg boss च्या स्पर्धकांकडे ऑफर्सच्या रांगा; सुरेखा कुडची झळकणार 'या' लोकप्रिय मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 3:22 PM

Surekha kudchi : जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे यांना चित्रपट आणि मालिकांची ऑफर मिळाली आहे. यामध्येच आता अभिनेत्री आणि सुरेखा कुडची हिलादेखील एका मालिकेची ऑफर मिळाली आहे.

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेला 'बिग बॉस मराठी ३' (bigg boss marathi 3) या रिअॅलिटी शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यंदाचं पर्व अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलं. यात खासकरुन स्पर्धकांमधील मैत्री आणि त्यांच्या टास्क खेळण्याची पद्धत यांची चर्चा रंगली. यंदाच्या पर्वात  अभिनेता विशाल निकम (vishal nikam) विजेता ठरला आहे. तर जय दुधाणे  (jay dudhane) उपविजेता. विशेष म्हणजे हा कार्यक्रम संपल्यानंतरही त्यातील स्पर्धक चर्चेत आहेत. यात खासकरुन जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे  (utkarsh shinde) यांना चित्रपट आणि मालिकांची ऑफर मिळाली आहे. यामध्येच आता अभिनेत्री आणि 'बिग बॉस मराठी ३'ची माजी स्पर्धक सुरेखा कुडची (surekha kudchi)  हिलादेखील एका मालिकेची ऑफर मिळाली आहे.

अलिकडेच उत्कर्ष शिंदे एका आगामी कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर, दुसरीकडे सुरेखा कुडचीलादेखील मालिकेची ऑफर आली आहे. याविषयी तिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. 

तुझ्या रुपाचं चांदणं: नक्षीची भूमिका साकारणारी कोण आहे 'ही' अभिनेत्री? खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड सुंदर

"लवकरच येतेय तुम्हा सगळ्यांना भेटायला. नव्या भूमिकेत..", असं म्हणत सुरेखाने तिची पोस्ट केली आहे. त्यामुळे आता सुरेखाच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाटत पाहत आहेत. 

दरम्यान, सुरेखा लवकरच 'तुझ्या रुपाचं चांदणं' या मालिकेत झळकणार आहे. या  मालिकेत ती दत्ताच्या आईची म्हणजेच महेश्वरी पाटील यांची भूमिका साकारणार आहे.काही दिवसांपूर्वीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून यात सुरेखा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन