Join us  

Bigg boss marathi 3, Episodes, 13 Dec: कोणाला मिळणार थेट finale मध्ये एन्ट्री? स्पर्धकांमध्ये रंगणार Ticket To Finaleचा टास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 1:40 PM

Bigg boss marathi 3: आता घरामध्ये सात सदस्य उरले असून सगळ्याच सदस्यांची नजर बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आहे. हे सातही सदस्य आता शेवटच्या फेरीत पोहचण्यासाठी सज्ज आहेत.

बिग बॉस मराठीच्या (Bigg boss marathi 3) घरातून काल गायत्री दातार बाहेर पडली. त्यामुळे आता या शोमध्ये केवळ ७ जण राहिले आहेत. या सातही जणांमध्ये आता बिग बॉसची ट्रॉफी मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे. विशेष म्हणजे आता या सातही दावेदारांमध्ये “Ticket To Finale” हा नवा टास्क रंगणार आहे. ज्यामुळे यात विजयी स्पर्धेक थेट finale मध्ये जाणार आहे.

आता घरामध्ये सात सदस्य उरले असून सगळ्याच सदस्यांची नजर बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आहे. हे सातही सदस्य आता शेवटच्या फेरीत पोहचण्यासाठी सज्ज आहेत. या सात जणांमध्ये रंगणार आहे “Ticket To Finale” जिंकण्याचा टास्क. मीरा, जय, सोनाली, विशाल, विकास आणि उत्कर्ष यामध्ये बघूया कोणाला मिळणार टिकिट आणि कोणता सदस्य जाणार थेट finale मध्ये.

 नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले, "या आठवड्यात आपणा सर्वांना मिळणार आहे “Ticket To Finale” सज्ज व्हा. होणार आहे आणखी एक मोठा धमाका...", अशी घोषणा बिग बॉस करतात. 

दरम्यान,आता हा धमाका काय असणार ?या टास्कमध्ये नेमकं कोण जिंकणार आणि कोणाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार