Join us  

'बिग बॉस मराठी 2' -अभिनेत्री मैथिली जावकरचा प्रवास संपला,या कारणामुळे झाली एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:46 AM

अभिजीत केळकर आणि मैथिली जावकर हे डेंजर झोन मध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये मैथिली जावकर हीला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे.

ठळक मुद्देअभिजीत केळकर आणि मैथिली जावकर हे डेंजर झोन मध्ये होते पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर,माधव देवचके, नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते.

बिग बॉसच्या घरातून मराठमोळी अभिनेत्री मैथिली जावकर हिचा प्रवास संपला आहे. बिग ब़ॉसच्या घरातून तिची एक्झिट झालीय. सध्या बिग बॉस शो खूप चर्चेत आहे. त्यातच अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत. इथे अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. 

 

शेवटी अभिजीत केळकर आणि मैथिली जावकर हे डेंजर झोन मध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये मैथिली जावकर हीला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे. महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर मैथिलीला तिच्या घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले, तेंव्हा ती म्हणाली माझ्यासोबत सगळेच अगदी उद्धट, उर्मट अगदी निवडून या घरामध्ये आणले आहेत, जे दुसऱ्यांचं अजिबात ऐकत नाहीत.

घरामध्ये कोण तुला मित्र म्हणून मिळालं असं विचारले तेंव्हा मैथिलीने सांगितले नेहा सोडून घरामध्ये सगळेच मला जवळचे होते आणि आहेत. सगळ्यांशी माझी घट्ट मैत्री झाली. बिचुकले यांनी मला धाकटी बहीण तर माधवने मला मोठी बहीण म्हंटल, मला या घरामध्ये दोन भाऊ मिळाले असे मी म्हणेन. 

टॅग्स :मैथिली जावकरबिग बॉस मराठी