Join us

बिग बॉसच्या घरामध्ये “सासूबाई” आणि “पिंकी पिंगळे” यांची धम्माल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 14:18 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यापासून स्पर्धक एकजुटीने रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. १५ एप्रिलपासून हा प्रवास सूरु झाला आज ...

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यापासून स्पर्धक एकजुटीने रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. १५ एप्रिलपासून हा प्रवास सूरु झाला आज या खेळाचा दुसरा दिवस. अवघ्या दोन दिवसातच घरामध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. काही काही विषयांवरून यांच्यामध्ये मतभेद होतात, भांडण होतात. तरीदेखील हे सगळे स्पर्धक एकत्र बसून स्वयंपाक बनवतात, घराची साफ सफाई करतात. या सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी मैत्री झाल्याचे दिसून येत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये येऊन आता दोनच दिवस झाले आहेत आणि स्पर्धकांनी एकमेकांना वेगवेगळी नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या या घरामध्ये सासूबाई आणि पिंकी पिंगळे यांची धम्माल मस्ती सुरु आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल सासुबाई आणि पिंकी पिंगळे कोण ? तर घरातील स्पर्धकांनी घरातील दोन सुंदर मुलींना म्हणजेच रेशम टिपणीस आणि मेघा धाडे हिला अनुक्रमे सासूबाई आणि पिंकी पिंगळे अशी नावे ठेवली आहेत.  मेघा धाडे पहिल्या दिवसापासून सांगत आहे कि, मला घरातील कामे करायला आणि स्वयंपाक घर आवरायला तसेच वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडते. किचनमधील कामे तसेच घराची आवरासावर करताना मेघा बऱ्याचदा प्रेक्षकांना दिसणार आहे. किचनची कामे करताना गाणी म्हणने, काम करत असताना डांस करणे हे मेघाचे सुरु असते. मेघाच्या जोडीला तिच्यासोबत असतात सई, स्मिता आणि या तिघींची मिळून किचनमध्ये धम्माल मस्ती सुरु असते. मेघाच्या पिंक कलरच्या आवडीमुळे तिला घरच्यांनी पिंकी पिंगळे हे नाव दिले आहे. तर रेशम टिपणीस हिला घरच्यांनी सासूबाई हे नाव ठेवले आहे.तसेच आरती, उषा नाडकर्णी आणि रेशम टिपणीस यांनी आपल्या मराठमोळ्या मुलींना बॉलीवूडच्या हिरोईनची नावे दिली आहेत. स्मिता गोंदणकर हिला प्रियंका चोप्रा, सई लोकूर हिला कतरिना कैफ आणि मेघा धाडेला हिला दुसरं नाव मिळालं आहे ऐश्वर्या राय बच्चन !