Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बॉस’चा मास्टर माइंड विकास गुप्ताने सेक्शुअ‍ॅलिटीवर केला मोठा खुलासा, वाचा काय म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 16:33 IST

विकासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या सेक्शुअ‍ॅलिटीवरही भाष्य केले आहे.

ठळक मुद्देमी जसा आहे सर्वांसमोर आहे. अभिमानानं उभा आहे. मला देवाने जसे बनवले आहे त्याबाबत आता मी लाज किंवा बुलींग सहन करणार नाही,असेही त्याने म्हटले आहे.

बिग बॉस 11’चा स्पर्धक विकास गुप्ता गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करणारी पोस्ट शेअर करताना विकासने स्वत:बद्दलचेही काही खुलासे केले होते. टीव्ही इंडस्ट्रीतील काही लोकांनी मला खूप मानसिक त्रास दिला. यामुळे मी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे विकासने सांगितले होते. पार्थ समथान, प्रियांक शर्मा व शिल्पा शिंदे हे आपल्याबद्दल खोट्या अफवा पसरवून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने म्हटले होते. आता विकासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या सेक्शुअ‍ॅलिटीवरही भाष्य केले आहे. मी बायसेक्शुअल आहे आणि हे सांगताना मला अभिमान वाटतोय, असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे.

‘तुम्हा सर्वांना माझ्याबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट कळावी, अशी माझी इच्छा आहे. मी बायसेक्शुअल आहे.  मी अभिमाननं सांगतो की मी बायसेक्शुअल आहे. मी एकटा नाही तर माझ्यासारखे अनेक आहेत. आता मला कोणी ब्लॅकमेल करणार नाही आणि बुलींग पण करणार नाही,’ असे विकासने या व्हिडीओत म्हटले आहे.

‘मी जसा आहे सर्वांसमोर आहे. अभिमानानं उभा आहे. मला देवाने जसे बनवले आहे त्याबाबत आता मी लाज किंवा बुलींग सहन करणार नाही. मी ही गोष्ट लपवली आणि त्यातून मला खूप त्रास झाला आहे. माझ्या कुटुंबानेही मला सोडून दिले. पार्थ समथान आणि प्रियांक शर्माने मला खूप वाईट वागणूक दिली आहे. पण मी त्यांच्यासोबत असे काहीही   करणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. प्रियांक आणि पार्थ यांच्यासोबत जे झाले त्यात त्या दोघांचा पूर्ण सहभाग होता. त्यामुळे त्यांनी माझ्यावर लावलेले आरोप हे पूर्णत: चुकीचे आहेत. या दोघांनी मला माझे तोंड उघडण्यास भाग पाडले. दोघांनीही माझ्यासोबत भयावह गोष्टी केल्या. पण त्या सांगून मी त्यांना जगापुढे लाजीरवाणे करू इच्छित नाही. माझ्या या व्हिडीओवर ते काही बोललेच तर मी पुन्हा एक पोस्ट करेन. मग त्यांना जे करायचे त्यांनी करावे, असेही त्याने म्हटले आहे.

टॅग्स :बिग बॉस