Join us

क्रिकेटरचा प्रताप! तिला म्हणाला- "मला एकट्यात भेट..."; 'बिग बॉस'च्या स्पर्धकाने सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:04 IST

नव्या पर्वाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच 'बिग बॉस'च्या एक्स स्पर्धकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. प्रसिद्ध क्रिकेटरने एकट्यात भेटण्याची ऑफर दिल्याचं या स्पर्धकाने म्हटलं आहे.

Bigg Boss: अनेक कारणांमुळे चर्चेत असलेला अतिशय वादग्रस्त पण तितक्याच आवडीने पाहिल्या जाणाऱ्या 'बिग बॉस'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच 'बिग बॉस'च्या एक्स स्पर्धकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. प्रसिद्ध क्रिकेटरने एकट्यात भेटण्याची ऑफर दिल्याचं या स्पर्धकाने म्हटलं आहे. 

'बिग बॉस १८'मध्ये सहभागी झालेली कशिश कपूर हिने क्रिकेटरचं नाव घेता त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कशिशने नुकतीच फिल्मीग्यानला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने क्रिकेटरचा हा प्रताप सांगितला. कशिश म्हणाली, "तो खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेटर होता. माझ्यासाठी हा अनुभव खूपच धक्कादायक होता. त्याने मला सांगितलं की मला एकट्यात भेट. मी लगेचच त्याला नाही म्हटलं. क्रिकेटर असशील तू तुझ्या घरी. माझ्यासाठी तू फक्त एक मुलगा आहेस. तू एक क्रिकेटर आहेस फक्त यामुळे मी प्रभावित होणार नाही". 

कशिश पुढे म्हणाली, "त्याला वाटलं की तो एक क्रिकेटर आहे तर मी लगेचच इंप्रेस होईन. आणि त्याच्यासाठी हे सोपं असेल. त्याची ही गोष्ट मला अजिबातच आवडली नाही. तू क्रिकेटर आहेस तर ते तुझं कामच आहे आणि मी त्याचा आदर करते. पण तू माझ्यासाठी क्रिकेट खेळत नाहीस की मी प्रभावित होईन". 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कशिश चर्चेत आली होती. तिच्या मुंबईतील राहत्या घरातून ४.५ लाख रुपये चोरीला गेले होते. घरकाम करणाऱ्या सचिन कुमार चौधरीवर तिने चोरीचा आरोप केला होता. त्याविरोधात तिने पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार