Join us  

Himanshi Khurana : बिग बॉस फेम हिमांशी खुरानाची तब्येत बिघडली; थंडीत शूट करणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 5:38 PM

पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना आगामी 'फत्तो दे यार बडे'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग ठिकाणचे तापमान फारच कमी असल्याने हिमांशीला थंडी असह्य झाली.

Himanshi Khurana :  पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना आगामी 'फत्तो दे यार बडे'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग ठिकाणचे तापमान फारच कमी असल्याने हिमांशीला थंडी असह्य झाली. यामुळे तिची तब्येत बिघडली आहे. तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. यानंतर तिला त्वरित रोमानियाच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हिमांशी खुराना बिग बॉस मधून प्रकाशझोतात आली होती. फिल्म शूट करत असताना जवळपास ७ डिग्री तापमान होते. ती आराम न करता शूट करत असल्याने तिला थंडी असह्य झाली. दरम्यान एका सीन मध्ये थंड पाण्यातही शूट करायचे होते. जेव्हा तब्येत जास्तच बिघडली तेव्हा तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. यामुळे क्रू मेंबर्सही घाबरले. हिमांशीच्या तब्येतीबाबत अद्याप आणखी अपडेट मिळालेली नाही.

हिमांशीने अनेक पंजाबी चित्रपटांत काम केले आहे. साड्डा हक, लेदर लाईफ और अफसर, जीत जाएंगे जहा या सिनेमांचा समावेश आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडिओ मध्ये काम केले आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनअपघातसोशल मीडिया