Join us
Daily Top 2Weekly Top 5

असा गेला बिग बॉसमधील दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 13:43 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये विनितच्या एलिमनेशनंतर त्याला एक विशेष अधिकार मिळाला आहे. या अधिकारानुसार तो कोणत्याही एका स्पर्धकाला ...

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये विनितच्या एलिमनेशनंतर त्याला एक विशेष अधिकार मिळाला आहे. या अधिकारानुसार तो कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्यात घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करू शकतो आणि विनितने यासाठी अनिल थत्ते यांना नॉमिनेट केले आहे. आता येत्या आठवड्यामध्ये अनिल थत्तेंबरोबर कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे पाहाणे रंजक असणार आहे. आजचा दिवस तसा शांततेमध्ये सुरू होणार असून रेशम आणि सई मध्ये सगळे काही ठीक होत आहे असे दिसणार आहे. घर म्हटले की, भांडण होणार, कधी मत जुळणार तर कधी मतभेद होणार, हे सगळे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून सुरू आहे.आज बिग बॉस घरातील रहिवाशांना एक कार्य दिले जाणार आहे. एक से भले दो असे म्हटले जाते, त्यामुळेच जगात जोडींचे अनन्य साधारण महत्त्व आहे. बिग बॉसच्या घरामध्ये लाडी – गोडीने तर कधी चकमकींमुळे निरनिराळ्या जोड्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बिग बॉस आज घरातील सदस्यांना “तुझी माझी जोडी” हे कार्य देणार आहे. “तुझी माझी जोडी” या कार्याच्या अंतर्गत नव्या जोड्यांचे ज्वलंत समीकरण कसं जुळते हे पाहाण्यासारखे ठरेल यात वाद नाही. तसेच या कार्याचा नॉमिनेशन प्रक्रियेवर देखील परिणाम होणार आहे.बिग बॉसमध्ये एकमेकांमधील मतभेद विसरून या नव्या जोड्या कशा कार्य पार पाडतील? येत्या आठवड्यात कोण नॉमिनेट होईल? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना बिग बॉस या कार्यक्रमाच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. घराला घरपण हे घरातील सदस्यांमुळेच असते. आता बिग बॉसच्या घरातून एक एक करून सदस्य घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे वाईट तर वाटणारच. पण हा खेळ असाच सुरू राहणार आहे. कार्यक्रमाच्या फॉर्मेटनुसार कोणी एक सदस्य दर आठवड्याला घरामधून बाहेर जाणार हे निश्चित आणि या बद्दलची कल्पना प्रत्येक सदस्याला आहे. म्हणूनच या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचविण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मत दिली, पण ज्या सदस्याला कमी मत मिळाली त्याला या घरामधून बाहेर पडणे अनिवार्य होते. त्यामुळेच विनीतला घराबाहेर जावे लागले. विनीतच्या घराबाहेर जाण्याने सगळ्यांनाच खूपच दु:ख झाले.  Also Read : 'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन!