'बिग बॉस १९' च्या घरातील ड्रामा, गोंधळ आणि स्पर्धकांमधील भांडणे नेहमीच चर्चेत असतात. आता फिनालेही जवळ येत असल्याने, स्पर्धक आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर, चाहतेही आपल्या आवडत्या स्पर्धकांना सोशल मीडियावर सपोर्ट करत आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक यादी व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहते चकीत झाले आहेत. खरेतर, या यादीत शोचा विजेता, रनर-अप्स आणि बाहेर पडलेल्या स्पर्धकांची नावे लिहिली आहेत. चला तर मग, या यादीनुसार शोचा विजेता कोण बनणार आहे, हे जाणून घेऊया.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या यादीनुसार 'बिग बॉस १९'चा विजेता गौरव खन्ना बनणार आहे. तर, अभिषेक बजाज या सीझनचा फर्स्ट रनर-अप आणि फरहाना भट्ट सेकंड रनर-अप असेल. या यादीत अमाल मलिक तिसऱ्या क्रमांकावर, तान्या मित्तल चौथ्या क्रमांकावर आणि अशनूर कौर पाचव्या क्रमांकावर आहे.
या यादीत बाहेर पडलेल्या स्पर्धकांची नावे देखील पाहायला मिळत आहेत. ते देखील त्याच क्रमाने, ज्या क्रमाने ते बाहेर पडले आहेत. यादीनुसार, प्रणित ७० व्या दिवशी शो सोडणार होता आणि या आठवड्यात तसंच पाहायलाही मिळालं. जर ही यादी खरी मानली, तर या आठवड्यात नीलम आणि पुढच्या आठवड्यात शहबाज घराबाहेर पडेल.
निर्मात्यांना केलं जातंय ट्रोलमात्र, ही व्हायरल झालेली यादी खरी आहे की खोटी, याबाबत कोणताही दावा केला जाऊ शकत नाही. आता जेव्हा या यादीत गौरव खन्नाला विजेता घोषित केले जात आहे, तेव्हा त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचबरोबर, अनेक लोक असेही म्हणत आहेत की, गौरव खन्ना हा फिक्स्ड विनर आहे आणि मेकर्सनी हे आधीच ठरवलं आहे. याशिवाय, ही यादी पाहिल्यानंतर अनेक लोक अमाल आणि फरहानाला सपोर्ट करताना दिसत आहेत. यादी व्हायरल झाल्यानंतर शोबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, जर व्हायरल होणारी ही यादी खरी असेल, तर 'बिग बॉस' हा शो स्क्रिप्टेड आहे आणि मेकर्स जनतेला मूर्ख बनवत आहेत.
Web Summary : A viral list claims Gaurav Khanna wins Bigg Boss 19, followed by Abhishek Bajaj and Farhana Bhatt. The alleged leak sparks debate, with some viewers questioning the show's authenticity and accusing producers of scripting the results. Evicted contestants' order matches the list.
Web Summary : एक वायरल सूची में दावा किया गया है कि गौरव खन्ना बिग बॉस 19 जीतते हैं, जिसके बाद अभिषेक बजाज और फरहाना भट्ट हैं। कथित लीक ने बहस छेड़ दी, कुछ दर्शकों ने शो की प्रामाणिकता पर सवाल उठाया और निर्माताओं पर परिणाम स्क्रिप्ट करने का आरोप लगाया। बेदखल प्रतियोगियों का क्रम सूची से मेल खाता है।