बिग बॉस १९ (Bigg Boss 19) मध्ये सगळ्यांनाच 'वीकेंड का वार'ची उत्सुकता असते. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान येतो आणि स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो. पण या आठवड्यात सलमान खान (Salman Khan) नाही, तर दुसरीच व्यक्ती 'वीकेंड का वार'मध्ये येऊन स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून दिग्दर्शिका-कोरिओग्राफर फराह खान आहे. फराह खान (Farah Khan) सर्वांवर खूप भडकणार आहे.
'वीकेंड का वार'चा प्रोमो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फराह खान कुनिका सदानंदच्या वर्तुणूकीवर भडकताना दिसणार आहे. त्या कुनिकाला खूप सुनावणार आहे आणि त्या वेळी कुनिकाच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत. फराह खान म्हणाली, ''कुनिकाजी, घरात तुमचं जे वागणं आहे, कुणाच्या तरी ताटातून जेवण काढून ठेवणे, हे सगळ्यांसाठी खूप धक्कादायक आहे. तुम्ही थेट 'संगोपना'वर बोलता. जे खूप चुकीचं आहे. आपला किंवा इतर कोणाचाही अधिकार नाही की कुणालाही टोकावं. तुम्हाला वाटतं की तुम्ही कधीच चुकत नाही, तुम्ही 'कंट्रोल फ्रीक' बनत चालला आहात.' फराह खान जेव्हा कुनिकाला ओरडत होती, तेव्हाही कुनिकाचा अॅटिट्यूड स्पष्ट दिसत होता. ती फराहचं बोलणं ऐकून विचित्र हावभाव करत होती.
कुनिकाने या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये तान्याला तिच्या संगोपनाबद्दल बोलली होती. त्यानंतर तान्या रडून बेहाल झाली होती. कुनिकाच्या या कृतीमुळे घरातील सर्व सदस्य तिच्या विरोधात गेले होते. फराह खानने फक्त कुनिकालाच नाही, तर बसीर अली आणि नेहल यांनाही फटकारलं. फराह खान बसीरला म्हणाल्या, ''तुम्हाला वाटतं की तुम्ही चुकीच्या सीझनमध्ये आला आहात. सांगा तुम्हाला कोणते स्पर्धक हवे होते, आम्ही यांना बदलून टाकतो.'' तर, भांडणावरून नेहललाही ओरडा पडला.