Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:48 IST

कोण आहे ही अभिनेत्री?

'बिग बॉस'चा १९ वा सीझन अंतिम टप्प्यात आहे. ७ डिसेंबर रोजी सीझनचा फिनाले आहे. गौरव खन्ना, प्रणित मोरे, फरहाना भट, तान्या मित्तल आणि अमाल मलिक हे पाच स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. मराठमोळा प्रणित टॉप ५ मध्ये असल्याने मराठी प्रेक्षक आनंद व्यक्त करत आहेत. तसंच तोच जिंकावा म्हणून भरभरुन मतही देत आहेत. मराठी इन्फ्लुएन्सर्स, चाहते प्रणितला प्रमोट करत आहेत. दरम्यान एका बॉलिवूड अभिनेत्रीनेही प्रणित मोरेला पाठिंबा दिला आहे. 

ही अभिनेत्री आहे शिल्पा शिरोडकर. शिल्पा बिग बॉसच्या आदल्याच सीझनमध्ये दिसली होती. आता तिने ट्वीट करत प्रणितला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचा फोटो शेअर करत तिने लिहिले, "हे बघा, मला माहित आहे प्रत्येकाचाच आवडता स्पर्धक असतो. पण माझ्यासाठी फक्त एकच आहे. तो म्हणजे प्रणित मोरे. मला खरोखर असं वाटतं की तो एकमेव ज्याने कोणताच दिखावा केला नाही. तो आहे तसाच दिसला. आपली अशा अनेक लोकांशी ओळख होते जे स्वत:ची खरी बाजू दाखवतात आणि त्यापैकीच एक प्रणित आहे. तो खरा हिरो आहे."

ती पुढे लिहिते, "जर तुम्हीही हे पाहिलं असेल तर माझ्यासोबत उभे राहा आणि प्रणितला लगेच वोट करा. त्याचा प्रामाणिकपणा जपूया. त्याला विजेता बनवूया."

शिल्पा शिरोडकर स्वत: मराठी कुटुंबातलीच आहे. मात्र शिल्पाच्या या पोस्टवरुन तिला अनेकांनी प्रश्नही केला आहे. 'तो मराठी आहे म्हणून तू त्याला पाठिंबा देत आहेस. सगळ्यांचा कोणी ना कोणी आवडता असतोच पण आपण जो पात्र आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे','मराठी कार्ड' अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bollywood actress supports Pranit More in Bigg Boss 19 finale.

Web Summary : Shilpa Shirodkar supports Marathi contestant Pranit More in Bigg Boss 19. Some netizens accuse her of playing the 'Marathi card'.
टॅग्स :शिल्पा शिरोडकरबिग बॉस १९मराठी अभिनेता